बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट ठरलेत. यातच आता

Mere Husband Ki Biwi Movie Review : प्रेम, कॉमेडी सोबतच दमदार अभिनय

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट ठरलेत. यातच आता प्रेम, कॉमेडी सोबतच दमदार अभिनय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट आलाय तो म्हणजे मेरे हसबैंड की बीवी. 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. प्रेम, कॉमेडी सोबतच दमदार अभिनय असे समीकरण यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. या चित्रपटात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, रकुलप्रीत सिंग आणि हर्ष गुर्जर हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळताय. 

Vishal Dadlani : 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'

काय आहे चित्रपटाची खासियत: 

अंकुर चड्ढा म्हणजेच अभिनेता अर्जुन कपूर हा घटस्फोटित असून त्याचे प्रभलीन ढिल्लन म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर सोबतचे लग्न संपुष्टात आले आहे. पण घटस्फोट होऊनही, प्रभलीनची दुःस्वप्ने तिला अजूनही सतावत आहेत. तिचा मित्र रेहान म्हणजेच हर्ष गुर्जर तिला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण तो अपयशी ठरतो. दरम्यान, अंतरा खन्ना म्हणजे अभिनेत्री रकुलप्रीत सिंग अंकुरच्या आयुष्यात प्रवेश करते आणि तो पुन्हा प्रेमात पडतो. मोठ्या कष्टाने, अंकुर अंतराला त्याच्याशी लग्न करण्यास राजी करतो, पण नंतर एक अपघात होतो ज्यामुळे प्रभलीन त्याच्या आयुष्यात परत येते. यानंतर अंकुरला मिळवण्यासाठी लढाई सुरू होते जी प्रभलीन आणि अंतरा यांच्यात तीव्र संघर्षात रूपांतरित होते. चित्रपटाचा कळस याच संघर्षाभोवती फिरतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे असून मुदस्सर अझीझ यांनी चित्रपटाची कथा रंजक बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु कमकुवत पटकथा आणि अप्रभावी संवादांमुळे चित्रपट विखुरलेला दिसतो. दरम्यान मेरे हसबैंड की बीवी हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेम, कॉमेडी सोबतच दमदार अभिनय यात पाहायला मिळतोय. 'जय महाराष्ट्रने' या चित्रपटाला पाच पैकी तीन रेटिंग दिले आहे