प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा नेहमी त्य

Ameya Khopkar ON Kapil Sharma : 'कपिल शर्माला चालेल का त्याचा उल्लेख टपिल शर्मा केलेला?'; अमेय खोपकर आक्रमक

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा नेहमी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे ओळखला जातो. अशातच, कपिल शर्मा आता मनसेच्या निशाण्यावर आला आहे. 

गुरुवारी, मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्मावर भाष्य करत म्हणाले की, 'बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन 30 वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. 1995 महाराष्ट्र शासन व 1996 मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे'. 

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून आम्ही कपिल शर्माचा नवीन शो बघत आहोत. सतत मुंबईचा उल्लेख हा बॉम्बे बॉम्बे म्हणून करतो. तिथे येणाऱ्या सेलिब्रिटीज, कपिल शर्मा, इतर शो अँकर आणि इतर लोकांकडून केला जातो. याचा आम्ही निषेध करतो. ध्यानात ठेवावं आमच्या शहराचं नाव मुंबई आहे बॉम्बे नाही. इतर वेळेला बोलताना तुम्ही बरोबर बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हे त्याची नावं वापरता, पण जेव्हा तुम्हाला मुंबईबाबत बोलायचं असेल, तेव्हा तुम्ही सतत बॉम्बे बॉम्बे उच्चार करता. याचा निषेध करतो. आज मी फक्त विनंती करतोय, याच्या पुढे तुमच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे होता कामा नये'.