Coolie VS Hridayapoorvam: मोहनलालच्या 'हृदयपूर्वम'ने 'कुली'ची हवा टाईट, तीन दिवसांची केली इतकी कमाई
Coolie VS Hridayapoorvam: दक्षिण भारतातील तीन चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यापैकी दोन नवीन चित्रपट म्हणजे 'हृदयपूर्वम' आणि 'लोका चैप्टर 1' आहेत. हे दोन चित्रपट 28 ऑगस्टला रिलीज झाले आहेत. तर 'कुली' चित्रपटाला रिलीज होऊन 16 दिवस पूर्ण झाले आहेत. चला तर पाहुयात, मल्याळम चित्रपट सुपरस्टार मोहनलालचा 'हृदयपूर्वम' आणि त्याच इंडस्ट्रीतील दुसरा स्टार टोविनो थॉमस-कल्याणी प्रियदर्शनचा 'लोका चैप्टर वन' या चित्रपटांनी दोन दिवसात किती कमाई केली आणि या चित्रपटांच्या रिलीजमुळे रजनीकांतच्या कुलीच्या कमाईवर किती परिणाम झाला आहे.
'हृदयपूर्वम'चे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन
अभिनेता मोहनलालच्या 'हृदयपूर्वम' या चित्रपटाने ओपनिंग दिवशी 3.25 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत चित्रपटाने 1.97 कोटी कमावले. एकूण कलेक्शनचा विचार केला तर आतापर्यंत 5.22 कोटी कमावले आहेत. सॅक्निल्कवर उपलब्ध असलेले हे आकडे अंतिम नाहीत, त्यात बदल होऊ शकतो.
'लोका चैप्टर वन'चे ऑफिस कलेक्शन
'लोका चैप्टर वन' हा चित्रपट सुपरनॅचरल लोका फ्रेंचायझीचा पहिला भाग आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त 2.7 कोटी रुपये कमावले. परंतु दुसऱ्या दिवशी त्याचे कलेक्शन वाढून ते 2.55 कोटी रुपये झाले आहेत. एकूण कलेक्शन 5.25 कोटी झाले आहे. सॅक्निल्कवरील हे आकडे अंतिम नसून यात देखील बद होऊ शकतो.
रजनीकांच्या कुलीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
रजनीकांतच्या 'कुली' या अॅक्शन चित्रपटाने 8 दिवसांत म्हणजेच पहिल्या आठवड्यात 229.65 कोटी तर दुसऱ्या आठवड्यात 41.85 कोटी कमावले आहेत. 14 व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 4.85 कोटी होते मात्र 15 व्या दिवशी 2.4 कोटी कमावले. मल्याळममधील दोन चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे 'कुली'च्या कलेक्शनमध्ये घट झाली.
हेही वाचा: Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17 व्या दिवशी आतापर्यंत चित्रपटाने 1.32 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 272.82 कोटी झाले आहे. चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटींहून अधिक कमावले असले तरी त्याचे बजेट 375 कोटी आहे. त्यामुळे 'कुली'चे बजेट अजून वसूल झालेले नाही.
फिल्मफेअरच्या माहितीनुसार, 'कुली'चे बजेट तब्बल 375 कोटी आहे. तर कोईमोईच्या माहितीनुसार 'हृदयपूर्वम' फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. सुपरनॅचरल 'लोका चैप्टर वन' देखील सॅक्निल्कनुसार केवळ 30 कोटींमध्ये बनला आहे. दोन्ही चित्रपटांच्या कमाईकडे बघता असे दिसते की पहिल्या वीकेंडमध्ये यात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे हे चित्रपट त्यांच्या बजेटच्या जवळ पोहचण्याची शक्यता आहे.