न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना नाना पाटेकर

MeToo प्रकरणात तनुश्रीला धक्का! नाना पाटेकर 7 वर्षांपूर्वीच्या आरोपांमधून निर्दोष मुक्त

Tanushree Dutta, Nana Patekar

Nana Patekar Gets Court Relief In Me Too Case: बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर 7 वर्षांपूर्वी 'मी टू'चा बळी ठरले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ताने उघडपणे नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता 7 वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण, आता न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना नाना पाटेकर यांना आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. नाना पाटेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. खरंतर नाना पाटेकर यांना न्यायालयाने दिलासा दिला होता. पण या निर्णयाला तनुश्री दत्ताने पुन्हा मुंबईच्या न्यायालयात आव्हान दिले. नानांना या दिलासा देण्याबाबत तनुश्री दत्ताने याचिका दाखल केली होती, जी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

न्यायालयाने फेटाळली तनुश्री दत्ता यांची याचिका -  

तनुश्री दत्ताची याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, '2008 च्या आरोपांनी कालमर्यादा ओलांडली आहे आणि 2018 च्या घटनेसाठी पाटेकर यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.' याचिका फेटाळल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताला धक्का बसला आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर हे प्रकरण चांगलेचं चर्चेत आले होते. 

हेही वाचा - प्रियांका चोप्राने विकले मुंबईतील 4 आलिशान अपार्टमेंट; किती कोटींमध्ये झाला व्यवहार? जाणून घ्या

#MeToo नावाची जागतिक मोहीम -  

खरं तर 2018 मध्ये जेव्हा MeToo नावाची जागतिक मोहीम सुरू झाली तेव्हा हा वाद सुरू झाला. हॉलिवूडपासून सुरू झालेला हा ट्रेंड महिलांना त्यांच्यावरील लैंगिक छळाबद्दल बोलण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला होता. जेव्हा ही मोहिमे भारतात पसरली तेव्हा येथील अनेक अभिनेत्रींनी त्यात भाग घेतला आणि त्यांचे अनुभव शेअर केले. 2008 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर छळाचे आरोप केले. त्यानंतर नाना पाटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली आणि नाना पाटेकर यांना दिलासा देण्यात आला.

हेही वाचा - सोन्याच्या तस्करीत कन्नड अभिनेत्री अडकल्याने खळबळ! 14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक

तनुश्रीने पुन्हा याचिका दाखल केली - 

तथापि, नाना पाटेकरांना दिलासा मिळाल्यानंतर तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आता नाना पाटेकर यांना पुन्हा दिलासा दिला आहे. तसेच न्यायालयाने तनुश्रीची याचिका फेटाळून लावली. तनुश्री दत्ताची याचिका फेटाळल्यानंतर 7 वर्षांनी आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.