Kunal Kamra Controversy: मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला समन्स; चौकशीसाठी हजर राहावे लागणार
Mumbai Police summons to Kunal Kamra: मुंबईच्या खार पोलिसांनी विनोदी कलाकार कुणाल कामराला समन्स पाठवले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुंबई पोलिसांनी विनोदी कलाकाराला चौकशीसाठी बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कुणाल कामरा यांना पाठवलेल्या समन्समध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.
कुणाल कामराला समन्स -
प्राप्त माहितीनुसार, कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर आहे. म्हणून हे समन्स त्यांना व्हॉट्सअॅपवरही पाठवण्यात आले आहे. मुंबई पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराच्या घरी नोटीसची प्रत्यक्ष प्रतही औपचारिकरित्या पाठवण्यात आली आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांना या नोटीसची माहिती देखील देण्यात आली आहे.
चौकशीसाठी पाठवण्यात आले सनम्स -
दरम्यान, मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे की, खार पोलिसांनी कुणाल कामराच्या घरी समन्स पाठवले असून त्याला आज सकाळी 11 वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. कुणाल सध्या मुंबईत नाही. स्टँड-अप कॉमेडी शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामराच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता, जो पुढील तपासासाठी खार पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
मी माफी मागणार नाही - कुणाल कामरा
तथापि, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कुणाल कामरा यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी मुंबईतील ज्या ठिकाणी कॉमेडी शो रेकॉर्ड केला गेला त्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीवर टीका केली. कामरा यांनी म्हटलं आहे की, मी माफी मागणार नाही. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपून ते शांत होण्याची वाट पाहणार नाही.'
तत्पूर्वी, मुंबईच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पहाटे कुणाल कामराविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला, ज्यामध्ये कलम 353(1)(ब) (सार्वजनिक त्रास देणारी विधाने) आणि कलम 356(2) (बदनामी) यांचा समावेश आहे.