आता रान्या जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठा

Ranya Rao Bail Petition Reject: तुरुंगात असलेली अभिनेत्री रान्या रावला सत्र न्यायालयाचा झटका! जामीन अर्ज फेटाळला

Ranya Rao

Ranya Rao Bail Petition Reject: सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेली कन्नड अभिनेत्री रान्या रावला सत्र न्यायालयातून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने अभिनेत्रीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रान्या रावचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला आहे. आता रान्या जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकते. जामीन नाकारण्यासाठी न्यायालयाने अनेक कारणे दिली आहेत. जर अभिनेत्रीची सुटका झाली तर ती देश सोडून पळून जाऊ शकते, असा युक्तिवाद न्यायालयाने केला. ती साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते किंवा तपासात अडथळा आणू शकते, अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त आहे. 

राण्या रावला सध्या तुरुंगातच राहावे लागणार - 

सोन्याच्या तस्करी प्रकरणात कथित सहभागासाठी अटक करण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिचा जामीन अर्ज गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडीतच ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी 14 मार्च रोजी आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. राण्याने यापूर्वी मॅजिस्ट्रेट कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु तिची विनंती फेटाळण्यात आली.

हेही वाचा - Gold Smuggling Case: ''मला कोठडीत मारहाण करण्यात आली, उपाशी ठेवण्यात आलं...'', राण्या रावचा DRI वर गंभीर आरोप

तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयात युक्तिवाद - 

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, राण्याचा सोन्याच्या तस्करी प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, ज्यामुळे सीमापार परिणामांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. रान्यावर तिच्या वारंवार परदेश दौऱ्यांदरम्यान कस्टम बॅगेज नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. रेकॉर्डनुसार, अभिनेत्रीने एका वर्षात 27 वेळा परदेश प्रवास केला.

हेही वाचा - 14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक झालेल्या रान्या रावचे वडील वडील रामचंद्र राव चर्चेत; याआधीही वादांमध्ये अडकले होते

दरम्यान, अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की जर रान्याला जामीन मिळाला तर ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते किंवा तपासाची दिशाभूल करू शकते. न्यायालयाने तिच्यावर 28 टक्के सीमाशुल्क चुकवण्यात सहभागी असल्याच्या आरोपांचीही दखल घेतली, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीचे एकूण 4,83,72,694 रुपयांचे नुकसान झाले.