हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रीमियम रिअ

सलमान खानने वांद्रे येथील अपार्टमेंट विकले; किती रुपयांमध्ये झाला व्यवहार? जाणून घ्या

Salman Khan

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील त्याची एक मालमत्ता विकली आहे. सलमानची ही मालमत्ता मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे होती. या महिन्यात या व्यवहाराची नोंदणी अधिकृतपणे पार पडली आहे. सलमान खानचे हे अपार्टमेंट वांद्रे पश्चिमेतील शिवस्थान हाइट्स या प्रोजेक्टमध्ये होते. हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटपैकी एक मानले जाते. या परिसरात अनेक नामवंत सेलिब्रिटींची घरे असून, येथे हेरिटेज बंगले, बुटीक व्यावसायिक प्रकल्प आणि लक्झरी अपार्टमेंट्सचा समावेश आहे. स्क्वेअरयार्ड्सच्या मते, सलमान खानने हे अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकले आहे. 

स्टॅम्प आणि नोंदणीसाठी दिले 'इतके' शुल्क - 

स्क्वेअर यार्ड्सने पुनरावलोकन केलेल्या आयजीआरच्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, सलमान खानने विकलेले अपार्टमेंट शिवस्थान हाइट्समध्ये आहे. त्याचे बिल्ट-अप क्षेत्रफळ 122.45 चौरस मीटर (सुमारे 1318 चौरस फूट) आहे. या करारात तीन कार पार्किंग जागा देखील समाविष्ट आहेत. या व्यवहारात 32.01 लाख रुपयांचे स्टॅम्प शुल्क आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. या व्यवहारात 3 कार पार्किंग जागांचाही समावेश आहे, जे वांद्र्यातील प्रीमियम प्रॉपर्टीजमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातो.

हेही वाचा - कियारा आणि सिद्धार्थच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन; चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण

वांद्रे येथील सलमान खानचे अपार्टमेंट असलेल्या परिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वांद्रे रेल्वे स्टेशन आणि येणाऱ्या मेट्रो मार्गांनी जोडलेला आहे. इतकेच नाही तर हा परिसर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), लोअर परळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांच्या जवळ आहे. सध्या बीकेसी हे व्यावसायिक दृष्टीने झपाट्याने वाढणारे क्षेत्र बनले आहे. येथे अलीकडेच Apple आणि Tesla सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी त्यांचे पहिले भारतीय स्टोअर्स सुरू केले आहेत. हे सर्व वांद्रे पश्चिमेच्या रिअल इस्टेट मूल्याला अधिक बळकटी देणारे घटक ठरत आहेत.

हेही वाचा - 'ही' आहे शाहरुख खानच्या मुलाची गर्लफ्रेंड; संपत्ती जाणून व्हाल थक्क

दरम्यान, सलमान खानच्या या व्यवहारामुळे वांद्रे पश्चिम आणि बीकेसी परिसरातील प्रॉपर्टी मार्केट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईतील प्रीमियम मालमत्तांची किंमत आणि मागणी अजूनही भक्कम असून, मोठ्या सेलिब्रिटींच्या अशा व्यवहारांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.