Sikandar Film Runtime : सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्र

Sikandar Film Runtime : ‘सिकंदर’चे रनटाइम, ट्रेलर रिलीज आणि स्टारकास्ट, सलमानच्या चित्रपटाबद्दल जाणून घ्या

Sikandar Film Runtime : ‘सिकंदर’चे रनटाइम, ट्रेलर रिलीज आणि स्टारकास्ट, सलमानच्या चित्रपटाबद्दल जाणून घ्या

Sikandar Film Runtime : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिकंदर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट 30 मार्च 2025 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गुढी पाडवा आणि ईदच्या सणाच्या सुट्ट्यांच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होत असल्यामुळे या चित्रपटाला शानदार ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचा रनटाईमची अपडेट आली समोर  सिकंदर हा चित्रपट सुमारे 2 तास 20 मिनिटांचा असेल. या चित्रपटाचे दोन भाग असतील. पहिला भाग 1 तास 15 मिनिटे आणि दुसरा भाग 1 तास 5 मिनिटांचा असेल. हा चित्रपट केवळ अॅक्शनने भरलेला नाही तर यात कुटुंबांसाठीही मनोरंजन नजराणा आहे, असे दिग्दर्शक मुरुगादास यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - यावर्षी शाहरुख खान, अक्षय कुमारला मागे टाकून 'या' अभिनेत्याने भरला सर्वाधिक कर

मुरुगादास यांनी चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती दिली नाही. पण त्यांनी, हा सलमान खानच्या फॅन्ससाठी एक परफेक्ट मसाला फिल्म असेल. तसेच चित्रपटात भावनिक घटक, रोमांचक ट्विस्ट आणि दमदार अॅक्शन यांचा समावेश असणारा चित्रपट असल्याचे स्पष्ट केलं आहे. 

ट्रेलर लवकर प्रेक्षकांच्या भेटीला  सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर 22 किंवा 23 मार्चला प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. ट्रेलरसोबतच अँडव्हान्स बुकिंग सुरू होईल. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी होऊ शकते.

हेही वाचा - गुलीगत सूरज चव्हाणच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा 'झापुक झुपूक' टिझर रिलीज!

सलमान-मुरुगादास प्रथमच एकत्र  सिकंदरच्या निमित्तानं सलमान खान आणि ए.आर. मुरुगादास पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. यापूर्वी मुरुगादास यांनी गजनी  (2008) चित्रपटासाठीही सलमानला विचारले होते. पण त्यावेळी हा प्रोजेक्ट पुढे सरकला नव्हता. अखेर 2025 मध्ये हे दोघं एकत्र येऊन सिकंदर बनवत आहेत.

तगडी स्टारकास्ट  सिकंदरमध्ये सलमान खानच्या सोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय प्रतीक बब्बर हा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. प्रतीकने यापूर्वीही नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण सिकंदरमधील त्याची भूमिका अधिक धक्कादायक आणि दमदार असेल, असे मानले जात आहे.