Punjab Flood : शाहरुख खानसह 'या' अभिनेत्यांनी केली पंजाबमधील पूरग्रस्तांसाची मदत; जाणून घ्या
पंजाब: पंजाबमध्ये आलेल्या मोठ्या पूर आपत्तीनंतर पूरबाधीत लोकांच्या मदतीसाठी अनेक संस्था आणि इतर नामवंत व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. अशातच, बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान, सोनू सूद यासारख्या अनेक अभिनेत्यांनी पंजाबमधील पूरबाधीत लोकांना मदत केले आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
सोनू सूद
पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदने आणि त्याच्या बहिणीने पुढाकार घेतला आहे. सोनू सूद आणि त्याच्या बहिणीने पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल होत आहे. सोनू सूदची बहीण पंजाबमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू देताना दिसत आहे.
सोनम बाजवा
लोकप्रिय अभिनेत्री सोनम बाजवानेही पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तिच्या सोशल मीडियावर अनेक हेल्पलाईन नंबर शेअर केले आहेत. ज्या भागातील लोकांना पूरचा सर्वाधिक सामना करत आहेत, त्यांनी या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात.
गायक दिलजीत दोसांझ
प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझने एक गाव दत्तक घेतले आहे. पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दिलजीत दोसांझने एक गाव दत्तक घेण्याचा निश्चय केला आहे.
रणदीप हुड्डा
लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डाने ग्राऊंड लेव्हलवर जाऊन पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत केले आणि जीवनावश्यक वस्तू दिले.
गायक अम्मी विर्क
गायक अम्मी विर्कने 200 कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. ज्यांचे घर पूरबाधीत झाले आहेत, ज्यांना राहण्यासाठी जागा नाही, तसेच, खाण्या-पिण्यासाठी काही बंदोबस्त नाही अशा लोकांकरिता एमीविकने 200 कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे.
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मीर फाउंडेशनने पंजाबमधील 1500 पूरग्रस्तांना मदत केली आहे.
'या विनाशकारी पुरामुळे पंजाबमध्ये ज्या पूरबाधीत लोकांना फटका बसला आहे, त्यांच्यासाठी मी खूप दु:खी आहे. तसेच, पूरबाधीत लोकांसाठी मी प्रार्थना करतो. पंजाबचा आत्मा कधीही तुटणार नाही, देव त्या सर्वांना आशीर्वाद देवो', असं ट्वीटही शाहरुखने केला आहे.