Sonu Sood Wife Accident: सोनू सूदच्या पत्नीचा मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकला धडकली कार
Sonu Sood Wife Accident: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनू सूदची पत्नी आणि काही कुटुंबातील सदस्य रस्ते अपघाताचे बळी ठरले आहेत. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. सोनू सूदच्या जवळच्या नातेवाईकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मुंबई नागपूर महामार्गाजवळ झाला. घटनेची माहिती मिळताच सोनू सूद नागपूरला रवाना झाला. सोनू सूदची पत्नी सोनाली सूद, त्याच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच भाचा आणि त्याची बहीण अपघातग्रस्त कारमध्ये होते. सोनू सूदच्या पत्नीची कार एका ट्रकला धडकली.
सोनाली सूदवर रुग्णालयात उपचार सुरू -
वृत्तानुसार, सोनाली सूदच्या प्रकृतीबाबत सोनू सूद किंवा त्याच्या कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत विधान नोंदवण्यात आलेले नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या ताज्या वृत्तानुसार, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की सोनाली आणि तिच्या भाच्याला पुढील 48-72 तास निरीक्षणाखाली ठेवले जाईल. अपघाताच्या वेळी सोनालीची बहीणही गाडीत होती. तिला किरकोळ दुखापत झाली आहे आणि ती धोक्याबाहेर आहे.
सोनाली-सोनूची प्रेमकहाणी -
सोनाली-सोनूची प्रेमकहाणी नागपुरात सुरू झाली होती. सोनाली सूद नागपुरातच शिक्षण घेत होती. सोनू सूदची प्रेमकहाणी नागपूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सुरू झाली, जिथे त्याची भेट एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या सोनालीशी झाली. चित्रपटात येण्यापूर्वी सुरू झालेली ही प्रेमकहाणी पुढे चालू राहिली आणि दोघांनीही दीर्घ डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Case: मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला CBI कडून क्लीन चिट
सोनाली-सोनू सूदचे लग्न 25 सप्टेंबर 1996 रोजी झाले. सोनू सूद आणि सोनाली आता दोन मुलांचे पालक आहेत. सोनालीला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते आणि ती क्वचितच कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्ट्यांमध्ये दिसते.