आसाममधील गुवाहाटी येथील गर्भांगा जंगलातील एका धबधब

'द फॅमिली मॅन सीझन 3' फेम अभिनेता रोहित बासफोरचा मृत्यू; गुवाहाटीतील धबधब्याजवळ आढळला मृतदेह

Rohit Basfore

Rohit Basfore Passes Away: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'द फॅमिली मॅन सीझन 3' या वर्षी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. या वेब सिरीजचा अभिनेता रोहित बासफोर याचे 27 एप्रिल संध्याकाळी निधन झाले. वृत्तानुसार, आसाममधील गुवाहाटी येथील गर्भांगा जंगलातील एका धबधब्याजवळ तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, रविवारी तो दुपारी त्याच्या मित्रांसोबत फिरायला घराबाहेर पडला होता आणि त्यानंतर तो परतलाच नाही.

ओडिशा बाइट्सच्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोहित काही महिन्यांपूर्वी मुंबईत काम संपवून गुवाहाटीला परतला होता. रोहित दुपारी 12:30 वाजता त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या घटनेनंतर त्याच्या एका मित्राने त्याच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) टीमशी संपर्क साधला आणि रोहितचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.

हेही वाचा - ए.आर. रहमानवर गाणे कॉपी केल्याचा आरोप! न्यायालयाने बजावली 2 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस

रोहित बासफोरच्या कुटुंबाचे मित्रांवर आरोप -  

दरम्यान, रोहित बासफोरच्या कुटुंबाने त्याच्या चार मित्रांवर आरोप केले आहेत, ज्यांच्यासोबत तो बाहेर फिरायला गेला होता. त्याच्या कुटुंबाने असा दावाही केला की, हे कृत्यू  त्याच्या मित्रांनीच केले आहे. रोहित पार्किंगच्या वादात अडकला होता, ज्यामुळे तीन लोकांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रणजीत बसफोर, अशोक बसफोर आणि धरम बसफोर असे त्याच्या मित्रांची नावे आहेत. कुटुंबाने जिमचा मालक अमरदीप यालाही दोषी ठरवले आहे कारण त्याने रोहितला बाहेर जाण्यासाठी आमंत्रित केले होते.

हेही वाचा - 'बाहुबली' पुन्हा मोठ्या पडद्यावर राज्य करणार; निर्मात्याने जाहीर केली Re-Release ची तारीख

अधिकाऱ्यांनी सोमवारी रोहितचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला, जिथे त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर अनेक भागांवर खुणा आढळून आल्या. तपासादरम्यान, त्याचे चारही मित्र फरार झाले आहेत. फिल्मीबीटच्या वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 25 मे रोजी संपत आहे, त्यानंतर 'द फॅमिली मॅन सीझन 3' प्रीमियर होण्याची अपेक्षा आहे.