'कांतारा: चॅप्टर 1' हा 2012 मध्ये आलेल्या 'कांतारा

Kantara Chapter 1 Trailer: प्रतीक्षा संपली! 'कांतारा चॅप्टर 1' चा ट्रेलर 'या' दिवशी रिलीज होणार

Kantara Chapter 1 Trailer: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता निर्मात्यांनी ट्रेलरची रिलीज तारीख जाहीर केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ट्रेलर 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12:45 वाजता रिलीज होणार असल्याची माहिती दिली. पोस्टमध्ये चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'कांतारा चॅप्टर 1 च्या जगात एक झलक पहा आणि एका दंतकथेच्या उदयाचे साक्षीदार व्हा.'

हेही वाचा -  Zubeen Garg Dies: संगीतविश्वावर कोसळली शोककळा! प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन

'कांतारा: चॅप्टर 1' हा 2012 मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटानंतरच्या सिरिजमधील पुढील भाग आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाशी स्पर्धा करेल. चित्रपट कन्नडसोबतच हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्येही प्रदर्शित केला जाईल.

हेही वाचा - Aryan Khan : आर्यन खानच्या The Bad**s Of Bollywood प्रीमिअरमधील मिस्ट्रीगर्लने वेधले लक्ष; जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री

चित्रपटात एका भव्य युद्धदृश्याचे विशेष लक्ष वेधले आहे. निर्मात्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे दृश्य तयार केले असून, यात 500 हून अधिक कुशल सैनिक आणि 3,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत. युद्धदृश्याचे शूटिंग 25 एकरवर पसरलेल्या शहरात, खडकाळ भूभागात 45-50 दिवसांमध्ये करण्यात आले, ज्यामुळे ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या दृश्यांपैकी एक ठरले आहे. प्रेक्षक आता ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक असून 'कांतारा चॅप्टर 1' च्या मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.