Famous Childhood TV Shows: 'हे' आहेत बालपणीतील काही प्रसिद्ध टीव्ही शो
लहानपणी, शाळेतून आल्यावर लहान मुले दप्तर आणि शूज बाजूला ठेवून आवडते कार्यक्रम पाहण्यात तासन् तास टीव्हीसमोर घालवायचे. त्यावेळी, सेल फोन, इंटरनेट किंवा प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे, आपल्यापैकी अनेकांनी मैदानी खेळांचा आनंद लुटला किंवा आवडत्या टीव्ही कार्यक्रमांना पाहायचे. मात्र मोठे झाल्यानंतर आपल्यासाठी ते क्षण नॉस्टॅल्जिक (Nostalgiac) बनला. आजही जेव्हा आपण हे टीव्ही शो यूट्यूबवर पाहतो, तेव्हा आपल्याला बालपणातील गोष्टी आठवू लागतात. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण-कोणते होते ते टीव्ही शो, ज्याला आजही आपण आवडीने पाहतो. जसजसे मोठे झालो तसतसे ते क्षण अनेकांसाठी नॉस्टॅल्जिक झाले. आताही जेव्हा आपण हे शो यूट्यूबवर बघतो तेव्हा आपल्याला आपल्या बालपणीची आठवण येते. चला तर जाणून घेऊया, कोणते टीव्ही शो अजूनही प्रेक्षकांना आवडते हे आपण शोधणार आहोत.
1 - ताकेशीचा कॅसल (Takeshi’s Castle):
ताकेशीचा कॅसल (Takeshi’s Castle) हा एक जपानी गेम शो होता ज्यात अभिनेता जावेद जाफरी होता, ज्याने आपल्या विनोदी आणि विलक्षण कॉमेंट्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. स्पर्धकांनी विविध मजेदार आणि अनोखी आव्हाने पूर्ण करण्यासाठी धडपड केल्यामुळे दर्शकांना अनेकदा अनियंत्रितपणे हसताना दिसले. हा शो टोकियो ब्रॉडकास्टिंग सिस्टीमवर 1986 ते 1990 पर्यंत प्रसारित झाला आणि आताही, प्रेक्षक YouTube वर त्याचा आनंद घेत आहेत.
2 - टॉम अँड जेरी (Tom and Jerry):
टॉम आणि जेरी (Tom and Jerry) ही एक कार्टून मालिका आहे जी कार्टून नेटवर्कवर प्रसारित केली गेली. टॉम अँड जेरीच्या खोडकर कृत्यांना प्रेक्षक कधीही कंटाळत नाहीत. हा शो प्रेक्षकांसाठी ताजा आणि खास आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण या लाडक्या मालिकेचे चाहते आहेत.
3 - आर्ट अटॅक (Art Attack):
चित्रकलेच्या दुनियेत वेगळं काहीतरी शिकवणारा आर्ट अटॅक (Art Attack) हा शो पाहून अनेक मुलांमध्ये चित्रकलेबद्दलची गोडी निर्माण केली होती. या टीव्ही शोमधील गौरव जुयाल यांनी मोठमोठ्या वस्तू वापरून केलेली कलाकृती बघणं एक पर्वणीच होतं.
4 - विक्राल आणि गब्राल (Vikraal aur Gabraal):
लहान मुलांच्या हॉरर मालिकांमध्ये हा शो सर्वात जास्त लोकप्रिय होता. विक्राल आणि त्याचा सहाय्यक गब्राल हे दोघं भूतांशी कसे लढतात, त्यांचा सामना कसा करतात, हे पाहत असताना प्रेक्षकांना खूप उत्सुकता वाटायची.
5 - शरारत (Shararat):
शरारत (Shararat) हा शो प्रत्येकाच्या मनात एक खास स्थान बनवले आहे. जिया आणि तिच्या आजीच्या जादूई गोष्टी, मजेशीर घटना आणि गोंधळ पाहून प्रत्येकाला वाटायचे की 'हे क्षण कधीच थांबू नये'.
6 - एम.ए.डी. विथ रॉब (M.A.D. with Rob):
रॉबसोबत क्रिएटिव्ह आर्ट शिकणं म्हणजे जणू एक वेगळाच अनुभव होता. रॉब यांनी घरच्या घरी करता येतील अशा कलाकृती शिकवल्या, ज्या पाहून लहान मुलांनी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करायचे. जर आजही हा शो सुरु असता, तर अजून कितीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळाले असते.
7 - खिचडी (Khichdi):
हास्याचा खजिना असलेली ही मालिका पुन्हा पुन्हा पाहावी अशीच आहे. हंसा आणि प्रफुल्ल यांच्यातील मजेशीर संवाद प्रेक्षकांना हसण्यास भाग पडायचे. 'बाबूजी, आप दुनिया के सबसे बुद्धिमान आदमी हो', हा डायलॉग आजही प्रेक्षकांना आठवतो. ही मालिका स्टार प्लसवर पाहायला मिळत होते.
8 - श... कोई है (Shh... Koi Hai):
हा एक हॉरर शो होता, जो प्रचंड गाजला होता. या शोमध्ये वेगवेगळ्या भुतांच्या कथा आणि त्यावर मात करणारे नायक पाहायला मिळणं म्हणजे थरारक अनुभव असायचा. हा शो जर अजून काही काळ सुरू असता, तर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भयकथा पाहायला मिळत असते.
9 - शक्तिमान (Shaktimaan):
भारतातील पहिला सुपरहिरो म्हणून शक्तिमान ही मालिका प्रचंड गाजली होती. हा शो प्रत्येक मुलांच्या हृदयाच्या जवळ होता. गंगाधरचा विनोदी अंदाज आणि शक्तिमानचा धाडसी रूप, यामुळे हा शो अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.