शाहरुख खानच्या 'या' गाण्याचे चित्रीकरण कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर झालंय? जाणून घ्या
नवी दिल्ली: बॉलीवूडचा 'किंगखान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानची अनेक गाणी सुप्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 2015 साली प्रदर्शित झालेला 'दिलवाले' चित्रपटातील गाणं म्हणजे 'गेरुआ'. या गाण्याच्या सुरुवातीला दर्शवण्यात आलेला नयनरम्य समुद्रकिनारा पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे हा नयनरम्य समुद्रकिनारा आहे तरी कुठे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
रयनिस्फजार बीच - आइसलँड:
या समुद्रकिनाऱ्याचे नाव आहे रयनिस्फजार समुद्रकिनारा, जे आइसलँडच्या दक्षिणेकडील किनारी भागामध्ये आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या नाट्यमय लँडस्केप्स, काळ्या वाळू, बेसाल्ट स्तंभ आणि शक्तिशाली लाटांसाठी ओळखले जाते. रेनिस्फजारा बीच हे आइसलँडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि अद्वितीय आकर्षणांपैकी एक आहे. रयनिस्फजार या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, या नयनरम्य समुद्रकिनारी फिरताना जीव धोक्यात जाण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. याचं कारण म्हणजे येथील समुद्राच्या लाट्या अत्यंत धोकादायक असतात.
या समुद्रकिनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील वाळू ही काळ्या रंगाची आहे. पर्यटकांनी असा दावा केला आहे की, या समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूचं सावट आहे. या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या स्नीकर लाटा खूप शक्तिशाली असतात. या लाटा अचानक कुठेही तयार होऊ शकतात आणि समुद्रकिनाऱ्यावर आदळू शकतात. या लाटांचा नियोजित नमुना नसल्यामुळे, जर त्या एखाद्याला सोबत घेऊन गेल्या तर त्यांचा मृत्यू अटळ मानला जातो.
या धोकादायक लाटांचा इशारा देणारे अनेक फलक या समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात आले आहेत. रेनिस्फजारा किनारपट्टीला भेट देणाऱ्या पर्यटकांना, 'सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करू नका', असा इशारा देण्यात आला आहे. त्यांना समुद्रकिनाऱ्यावरील फलकांवर लावलेल्या सूचना वाचण्याचा आणि समजून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्यांचे गांभीर्याने पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.