Robert Redford Dies: हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Robert Redford Dies: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे 89 व्या वर्षी निधन झाले. 16 सप्टेंबर 2025 रोजी प्रोव्हो, युटा जवळील त्यांच्या घरी रॉबर्ट रेडफोर्ड यांनी अखेरचा श्वास घेतला. रेडफोर्ड हे फक्त एक अभिनेता नव्हते, तर त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ अमेरिकन चित्रपटसृष्टीला आकार दिला. 'बुच कॅसिडी अँड द सनडान्स किड', 'द स्टिंग', 'ऑल द प्रेसिडेंट्स मेन' आणि ऑस्कर विजेता दिग्दर्शक 'ऑर्डिनरी पीपल' या चित्रपटांमधील त्यांच्या बहुमुखी प्रतिभेने त्यांना अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून अमर केले.
हेही वाचा - Umer Shah Shocking Death : 'पीछे तो देखो' मीममुळे लोकप्रिय झालेल्या अहमद शाहच्या लहान भावाचा आकस्मिक मृत्यू
त्यांनी सनडान्स इन्स्टिट्यूट आणि सनडान्स फिल्म फेस्टिव्हलची स्थापना करून स्वतंत्र चित्रपटांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन दिले. आधुनिक पॉप संस्कृतीतही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. 'कॅप्टन अमेरिका: द विंटर सोल्जर' (2014) आणि 'अॅव्हेंजर्स: एंडगेम' (2019) मध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे युवा प्रेक्षकांपर्यंत त्यांची लोकप्रियता पोहोचली. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार रॉबर्ट रेडफोर्डची एकूण संपत्ती 200 डॉलर दशलक्ष आहे.
रेडफोर्डचे यांचे पहिले लग्न 1958 मध्ये इतिहासकार लोला व्हॅन वेगेननशी झाले, त्यांना चार मुले झाली. तथापी, त्यांचे दुसरे लग्न 2009 मध्ये जर्मन कलाकार सिबिल झॅगर्सशी झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली शौना आणि एमी, तसेच अनेक नातवंडे आहेत. रॉबर्ट रेडफोर्ड यांचा वारसा फक्त अभिनय आणि दिग्दर्शनापुरता मर्यादित नव्हता. तथापी, पर्यावरणीय कार्य, संवर्धन, आणि स्वतंत्र चित्रपटांना प्रोत्साहन देणे हे देखील त्यांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहे.