बॉलीवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन

'ही' आहे शाहरुख खानच्या मुलाची गर्लफ्रेंड; संपत्ती जाणून व्हाल थक्क

मुंबई: बॉलीवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सतत चर्चेत असतो. सध्या, आर्यन खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची कथित प्रेयसी लारिसा बोनेसी. जेव्हा 2025 वर्ष सुरु होताना झालेल्या सेलिब्रेशनच्या मुंबईतील पार्टीत आर्यन आणि लारिसा एकत्र दिसले होते. तेव्हापासून हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. मात्र, सर्वांना हाच प्रश्न पडला आहे आणि ते म्हणजे कोण आहे आर्यन खानची गर्लफ्रेंड? चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

आर्यन खानच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे लारिसा बोनेसी. ती एक ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. यासोबतच, ती आता बॉलीवूडमध्ये करिअर करत आहे. लारिसा वयाच्या 13 व्या वर्षी चीनला गेली, जिथे तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. इतकच नाही तर 2011 मध्ये लारिसाने 'देसी बॉईज' मधील 'सुबा होने ना दे' या गाण्यातून बॉलिवूड जगतात पदार्पण केले. यासह, तिने तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. किंगखान शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि लारिसाला अनेक वेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. त्यामुळे, त्यांच्या डेटिंगच्या चर्चा आजही सुरू आहे. 

सोशल मीडियावर लारिसा अभिनेता शाहरुख खानच्या सर्व कुटुंबीयांना फॉलो करते. त्यामुळे, त्यांच्या नात्यांबद्दल सतत चर्चा सुरू असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लारिसा आर्यनपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. आर्यन 27 वर्षांचा आहे तर लॅरिसा 31 वर्षांची आहे. माहितीनुसार, लारिसाची एकूण संपत्ती सुमारे 171 कोटी असल्याचे म्हटले जाते.