शेफालीच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आ

शेफाली जरीवालाच्या मालमत्तेचा दावेदार कोण असेल? काय आहे नियम? जाणून घ्या

Shefali Jariwala

Shefali Jariwala Net Worth: 'कांटा लगा' या लोकप्रिय गाण्याने एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 27 जून 2025 रोजी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांबद्दल आणि संपत्तीबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. आता शेफालीची मालमत्ता कोणाला मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

शेफालीची संपत्ती - 

शेफालीने टीव्ही शो, रिअॅलिटी शो आणि कार्यक्रमांमध्ये काम केले. तिची एकूण मालमत्ता सुमारे 8.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ती एका कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी 10 ते 25 लाख रुपये घेत असे. याशिवाय, तिने इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही खूप कमाई केली. लाखो फॉलोअर्समुळे तिला ब्रँड प्रमोशनच्या ऑफर येत होत्या, ज्यामुळे तिचे मासिक उत्पन्न लाखोंमध्ये होते. 

हेही वाचा - शेफाली जरीवाला ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत 'या' कलाकारांना आला हृदयविकाराचा झटका

शेफालीची संपत्ती कोणाला मिळणार?

शेफाली जरीवालाचा दोन वेळा विवाह झाला होता. अभिनेत्रीचे पहिले लग्न 2004 मध्ये संगीत दिग्दर्शक हरमीत सिंग सोबत झाले होते, परंतु 5 वर्षांनी 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2014 मध्ये तिने टीव्ही अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफालीला अपत्य नव्हते. त्यामुळे आता तिची कोट्यवधींची मालमत्ता कोणाला मिळेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर नियमांनुसार, तिचा पती पराग त्यागी या संपत्तीचा कायदेशीर वारस असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - शेफाली जरीवालाच्या आधी बिग बॉसच्या 'या' 4 स्पर्धकांचाही झाला आहे मृत्यू

तथापी, कायद्यानुसार, जर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर तिची मालमत्ता प्रथम तिच्या पती, मुले आणि पालकांमध्ये विभागली जाते. जर मुले नसतील आणि पालक नसतील तर पतीला पूर्ण अधिकार मिळतात. जर महिलेला तिच्या पालकांकडून मालमत्ता वारसा मिळाली असेल तर ती मालमत्ता पालकांच्या कुटुंबाकडे जाते.