SALMAN KHAN: सलमान खानच्या सुरक्षा रक्षकाने आमिरच्या मुलाला जुनैदला ढकलले?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानला सतत जीव मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्यामुळे, त्याच्या सुरक्षेत कडक बंदोबस्त करण्यात आला. अलीकडेच, अभिनेता सलमान खान आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसला होता, जिथे सलमान खान त्याच्या प्रिय मित्राला, म्हणजेच आमिर खानला, पाठिंबा देण्यासाठी आला होता. मात्र, या कार्यक्रमात अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, 'यात जुनैदलाही का नाही सोडले? आणि सलमान खानच्या सुरक्षा रक्षकाने आमिरच्या मुलाला, म्हणजेच जुनैदला, का ढकलले?' चला तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
हेही वाचा: गोंदियाच्या आमगाव-देवरी महामार्गवर वाघाचे दर्शन
कडक सुरक्षेत सलमान खान पोहोचले एका कार्यक्रमात:
आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सलमान खान मोठ्या दिमाखात आला होता. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओत सलमान खान कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना दिसत आहे, जिथे त्याची टीम त्याला सुरक्षा कवचात घेऊन जात आहे. यादरम्यान, अभिनेता सलमान खानभोवती मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नेमकं त्याच फुटेजमध्ये, आमिर खानचा मुलगा जुनैद खान कडक सुरक्षेत सलमानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.
'या' कारणामुळे जुनैदला सलमान खानशी भेटू दिलं नाही:
सलमानच्या सुरक्षा पथकाने सलमानपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी जुनैदला बाजूला ढकलले. त्यामुळे जुनैदचा प्रयत्न अयशस्वी ठरला. जुनैदने सुरक्षा रक्षकासोबत बोलण्याचा प्रयत्नही केला, मात्र सलमान खानच्या सुरक्षा रक्षकाने त्याला सलमान खानपर्यंत पोहोचू दिले नाही.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरून केले होते पदार्पण:
या कार्यक्रमादरम्यान, अभिनेता सलमान खानचा चेहरा पूर्णपणे गंभीर दिसत होता आणि तो इकडे तिकडे न पाहता सरळ पुढे चालत होता. कदाचित सलमान खानला अंदाज नव्हता की जुनैद खान आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच, 2024 मध्ये जुनैद खानने 'महाराज' चित्रपटातून ओटीटी क्षेत्रात बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेने तमाम प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर तो दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा' या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. द्वैत चंदन दिग्दर्शित आणि एजीएस एंटरटेनमेंट आणि फँटम फिल्म्स निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात फक्त 8.85 कोटींची कमाई केली होती.