यो यो हनी सिंग आणि करण औजला अडचणीत; गाण्यातील आक्षेपार्ह भाषेमुळे कारवाईची मागणी
पंजाब: भारतातील दोन प्रसिद्ध पंजाबी गायक यो यो हनी सिंग आणि करण औजला सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या गाण्यांमधील कथित आक्षेपार्ह आणि महिलांविरोधातील भाषेमुळे दोघांविरुद्ध कारवाईची मागणी केली जात आहे. पंजाब राज्य महिला आयोगाने स्वतःहून याची दखल घेत कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. गायक करण औजलाच्या ‘एमएफ गब्रू’ गाण्यावर गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. याचबरोबर, हनी सिंगच्या ‘मिलियनेअर’ गाण्यावरही महिलांविरोधात अश्लील भाषा वापरल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
हेही वाचा - Ahaan Panday Video: अहान पांडेने खाल्ला 'विंचू'! नेटीझन्स म्हणाले, 'यापुढे तुझा एकही चित्रपट पाहणार नाही'
महिला आयोगाने या प्रकरणात पंजाबचे डीजीपी यांना पत्र लिहून संबंधित दोघांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, 11 ऑगस्ट 2025 रोजी हनी सिंग आणि करण औजलाला महिला आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, करण औजलाच्या ‘एमएफ गब्रू’ गाण्याला विरोध होत असून त्यात वापरलेली भाषा ही पंजाबच्या संस्कृतीला कलंकित करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गाण्याला अवघ्या 6 दिवसांत 34 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा - 15 ऑगस्टला मिळेल फुल एंटरटेनमेंट! थिएटरसह ओटीटीवर नवीन चित्रपट आणि सीरिज होणार प्रदर्शित
दरम्यान, हनी सिंगच्या ‘मिलियनेअर’ गाण्यावरही आक्षेप घेतला जात आहे. हनी सिंगच्या या गाण्याला आतापर्यंत 396 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हनी सिंगसाठी गाण्यांवरून वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांच्या गाण्यांवरून अनेकदा टीका झाली आहे.