आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सिंगापूर अधि

Zubeen Garg Postmortem: सिंगापूरमध्ये जुबीन गर्ग यांचे शवविच्छेदन पूर्ण; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली मोठी अपडेट

Zubeen Garg Postmortem: प्रसिद्ध आसामी गायक जुबीन गर्ग यांचे 19 सप्टेंबर 2025 रोजी सिंगापूरमध्ये डायव्हिंग अपघातात निधन झाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सिंगापूर अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. त्यांनी जुबीन गर्ग यांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या पार्थिवाला भारतीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या टीमला सुपूर्द केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, जुबीन गर्गसोबत आलेल्या टीममध्ये श्री शेखर जोती गोस्वामी, श्री संदीपन गर्ग आणि श्री सिद्धार्थ शर्मा (व्यवस्थापक) यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, गायक लाईफ जॅकेटशिवाय पोहत होता. लाईफगार्ड्सनी त्यांना लाईफ जॅकेट घालण्याचा आग्रह धरला होता. जुबीन गर्ग 18 लोकांबरोबर बोट ट्रिपवर गेले होते. काही वेळाने ते समुद्रात तरंगताना आढळले. त्यानंतर लाईफगार्ड्सनी त्यांना ताबडतोब CPR दिला. त्यानंतर त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा Farah Khan : दिलीपच्या पगाराबाबत फराहने केला गमतीदार खुलासा; म्हणाली, 'दिलीपचा पगार दरमहा...'

मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, झुबीनसोबत आलेल्या 11 लोकांमध्ये सिंगापूरमधील आसामी समुदायातील रहिवासी अभिमन्यू तालुकदार आणि त्यांचा बोट बुक केलेल्या इतर सदस्यांचा समावेश होता. याशिवाय गायकाच्या टीमचे चार सदस्य आणि दोन क्रू मेंबर्सही होते.

हेही वाचा - Zubeen Garg Dies: संगीतविश्वावर कोसळली शोककळा! प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन

अंतिम संस्काराची योजना

दरम्यान, मुख्यमंत्री बिस्वा सरमाने सांगितले की गायकाचे पार्थिव सरुसजाई स्टेडियम (गुवाहाटी) मध्ये ठेवले जाईल, जिथे जनतेला अंतिम श्रद्धांजली वाहता येईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की जुबीन गर्ग यांचे अंतिम संस्कार त्यांच्या कुटुंबाच्या निर्णयानुसार पार पडणार आहेत.