हे हत्याकांड संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले होते.

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र दाखल; सोनमवर गंभीर आरोप

Raja Raghuvanshi Murder Case: इंदूरहून हनिमूनसाठी गेलेले एक जोडपे 26 मे 2025 रोजी अचानक बेपत्ता झाले. मेघालयच्या जंगलातून 2 जून 2025 रोजी पती राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला, तर 8 जून2025 रोजी पत्नी सोनम रघुवंशीला गाजीपूरमध्ये पकडण्यात आले. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. हे हत्याकांड संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले होते. मेघालय पोलिसांनी आता या प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. 

या आरोपपत्रानुसार, सोनम रघुवंशीनेच आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता. सोनमसोबत या प्रकरणात तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याचे 3 मित्र विशाल सिंग चौहान, आशिष सिंग राजपूत आणि आनंद कुमार आरोपी म्हणून नाव नोंदले गेले आहेत. मेघालय पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) 238A/61(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - Red Fort: लाल किल्ल्यातून हिऱ्यांनी जडवलेला सोन्याचा कलश चोरीला; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

आरोपपत्रानुसार, '21 मे 2025 रोजी राजा आणि सोनम मध्य प्रदेशातून शिलाँगला पोहोचले. ते सोहरा येथे गेले आणि 26 मे 2025 रोजी बेपत्ता झाले. दोघांना शोधण्यासाठी तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. 2 जून 2025 रोजी राजाचा मृतदेह एका खोल खंदकातून सापडला.' चार्जशीटमध्ये पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या पुराव्यांसह आरोपींना अटक केली आहे. फॉरेन्सिक अहवालांच्या आधारावर पुढील कारवाईसाठी प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स, इमारतीचे मालक लोकेंद्र तोमर आणि गार्ड बलबीर अहिरबर यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - RDX Mumbai Bomb Threat : मुंबई बॉम्बस्फोट धमकीप्रकरणातील आरोपी अटकेत, 400 किलो RDX लपवण्याचा रचला कट

या प्रकरणामुळे देशभरात सुरक्षा आणि कौटुंबिक हिंसेविषयी चर्चा सुरू झाली आहे. आरोपींच्या कारवायांमुळे समाजामध्ये खळबळ उडाली असून, न्यायालयीन सुनावणीदरम्यान घटनास्थळाचे तपशील, साक्षीदारांची माहिती आणि फॉरेन्सिक अहवाल यांचा आधार घेऊन पुढील सुनावणी होईल.