महानगरपालिका निवडणुकीपूर्वी चिकन पार्टी! पुण्यातील जोडप्याने वाटले 5 हजार किलो चिकन
पुणे: 24 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. यापूर्वी 'गटारी' साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी बहुतेक घरांमध्ये मांसाहारी पदार्थ बनवले जातात. आता पुण्यातील एका जोडप्याने त्यांच्या 'धनंजय जाधव फाउंडेशन'च्या वतीने 5 हजार किलो मोफत चिकनचे वाटप केले आहे. आयोजकांच्या मते, या कार्यक्रमाचा उद्देश समाजाला सक्षम करणे आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेले धनंजय आणि पूजा जाधव या दाम्पत्याने 'धनंजय जाधव फाउंडेशन'च्या माध्यमातून मोफत चिकन वाटून नागरिकांचे लक्ष वेधले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते मिळविण्यासाठी ही एक अनोखी युक्ती असल्याचीही चर्चा आहे.
हेही वाचा - हल्ली कुणीही रमी खेळतं; माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री सरनाईकांची पाठराखण
मोफत चिकन मिळवण्यासाठी मोठी गर्दी -
पुण्यातील वॉर्ड क्रमांक 1 मधील धानोरी, भैरवनगर, मुंजाबावस्ती, जकात नाका आदी भागांमध्ये रविवारी झालेल्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली. ओळखपत्रासह नोंदणीची प्रक्रिया ठरवण्यात आली होती. तथापी, मोफत चिकन मिळवण्यासाठी लोकांनी लांबचं लांब रांगा लावल्या होत्या.
हेही वाचा - 'रमी' खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
चिकन घेण्यापूर्वी नोंदणी करणे आणि ओळखपत्र दाखवणे आवश्यक होते. सुरुवातीला ही प्रक्रिया सुरळीत पार पडली, परंतु थोड्याच वेळात गर्दी इतकी वाढली की नोंदणी करणे शक्य झाले नाही. तथापि, या संपूर्ण कार्यक्रमाची शहरात चर्चा होत आहे. काही लोक याला निवडणूक मार्केटिंग मानत आहेत, तर काही लोक याला लोकप्रियता मोहीम मानत आहेत.