पूर्वजांशी संबंधित 'या' 3 स्वप्नांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
मुंबई: आपले पूर्वज केवळ आपल्या जीवनाचा भाग नसू्न, ते आपले रक्षण करणारे अदृश्य मार्गदर्शकही असतात. हिंदू परंपरेनुसार, जर पूर्वजांचे आशीर्वाद लाभले, तर जीवनातील अनेक अडचणी सहज पार होतात. मात्र, जेव्हा पूर्वज काही सूचित करू इच्छितात किंवा नाराज असतात, तेव्हा ते स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देतात. अशा काही स्वप्नांकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
पूर्वज स्वप्नात दिसून अचानक गायब होतात -
जर तुम्हाला वारंवार असं स्वप्न पडत असेल की एखादा पूर्वज क्षणभर दिसतो आणि मग अचानक अदृश्य होतो, तर हे संकटाचं संकेत मानलं जातं. हे स्वप्न करिअर, व्यवसाय किंवा कौटुंबिक समस्यांचा इशारा असू शकतो. अशा वेळी सतर्क राहणे आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे असते.
हेही वाचा - या 5 राशींचे लोक असतात खूपच रोमँटिक; यांच्यावर राशीस्वामीचा असा असतो प्रभाव
पूर्वज स्वप्नात काही मागतात -
जर स्वप्नात पूर्वज तुम्हाला काही मागताना दिसले, तर ते आर्थिक संकटाचा इशारा असतो. हे स्वप्न सूचित करतं की भविष्यात पैशांची तंगी होऊ शकते. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजन अधिक भक्कम करणे आवश्यक असते.
हेही वाचा - Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेशाचा आगमन कधी? तारीख आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून
स्वप्तनात पूर्वज रडताना किंवा दुःखी दिसतात -
तथापी, पूर्वज स्वप्नात दुःखी, रडताना किंवा त्रस्त दिसले, तर ते 'पितृदोषा'चा इशारा मानला जातो. याचा अर्थ पूर्वजांचा आत्मा असमाधानी आहे. अशा स्वप्नांनंतर तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान करून पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा, जीवनात सतत अडथळे निर्माण होऊ शकतात.
काय आहे यावर उपाय?
तर्पण आणि श्राद्ध विधी करून पूर्वजांची प्रार्थना करा. गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा पैसे दान करा. घरात पवित्रता ठेवा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)