उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली असून

हिमाचलमध्ये कैलास यात्रेच्या मार्गावर अचानक पूर; ITBP ने वाचवले 413 यात्रेकरूंचे प्राण

Flash flood on Kailash Yatra route

शिमला: डोंगराळ राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील स्थिती चिंताजनक झाली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात अचानक पूर आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. 

किन्नौरमध्ये पूर; कैलाश यात्रा मार्ग ठप्प - 

किन्नौर जिल्ह्यातील किन्नर कैलाश यात्रा मार्गावर टांगलिंग परिसरात अचानक पूर आल्याने यात्रेतील शेकडो भाविक अडकले आहेत. पूरामुळे यात्रा मार्गाचा मोठा भाग वाहून गेला. यामुळे 413 यात्रेकरूंना आयटीबीपी (इंडो-तिबेटी सीमा पोलिस) च्या जवानांनी यशस्वीरित्या वाचवले. ITBP च्या 17 व्या बटालियनच्या पथकाने ट्रॅव्हर्स क्रॉसिंग तंत्राचा वापर करत यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवले. या ऑपरेशनमध्ये 4 अधिकारी, 29 जवान आणि NDRF च्या 14 सदस्यांनी भाग घेतला.

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे 200 हून अधिक जण बेपत्ता, आतापर्यंत 130 लोकांची सुटका

उत्तरकाशीत ढगफुटी -

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी रात्री ढगफुटी झाली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकांची तैनाती करण्यात आली आहे.

हेही वाचा - Cloudburst Hits Sukhi Village: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप! धरालीनंतर सुखी गावातही ढगफुटी

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने पुढील 24-48 तासांत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे डोंगराळ भागात रहिवाशांना आणि पर्यटकांना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.