पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर रोजी गु

PM Narendra Modi Birthday : गुजरातचे CM ते भारताचे PM; जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक प्रवास

नवी दिल्ली: 17 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे लहानशा गावात झाला. लहानपणापासूनच त्यांनी संघर्षाचे धडे घेतले. शिक्षण घेत असताना पंतप्रधान मोदी वडनगर येथील रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते. मात्र, चहा विकणारा एकेदिवशी भारताचा पंतप्रधान होईल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. मात्र, 

पंतप्रधान मोदींचे बालपण साधेपणात गेले. शिक्षण घेत असताना त्यांनी वडनगर येथील रेल्वे स्टेशनवर वडिलांना चहाच्या टपरीवर मदत केली. लहानपणापासूनच त्यांना देशभक्ती आणि समाजसेवेची आवड होती. याच जिद्दीमुळे वयाच्या आठव्या वर्षी त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ओळख झाली, त्यानंतर 1971 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे कार्यकर्ते बनले. तसेच, 1985 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने नरेंद्र मोदींना भाजप पक्षात नियुक्त केले. त्यानंतर, 1998 मध्ये नरेंद्र मोदी सरचिटणीस झाले. 2001 मध्ये नरेंद्र मोदींना गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले, त्यानंतर लगेचच ते विधानसभेवर निवडून आले.

हेही वाचा: Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यात ढगफुटीची परिस्थिती; 10 गावं जलमय, शेती व घरांचंही मोठं नुकसान

विशेष म्हणजे, नरेंद्र मोदींची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र, तरीही त्यांनी भूंकपाच्या दुर्घटनेतून गुजरात राज्याला कायाकल्प केले आणि विकासाचे एक नवीन मॉडेल सादर केले. विशेष म्हणजे, गुजरात राज्याच्या मॉडेलने गुंतवणूक, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नवीन उंची गाठली. त्यांच्या धोरणांमुळे फक्त गुजरात राज्याला आर्थिक विकासाला चालना मिळाली नाही, तर सामाजिक समावेशालाही प्राधान्य देण्यात आले. 

26 मे 2014 रोजी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे शपथ घेतली. जेव्हा, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती झाली, तेव्हा देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. पंतप्रधान बनल्यानंतर, नरेंद्र मोदींनी भारताच्या विकासकामासाठी अनेक नवनवीन योजना राबवल्या. लाडली बहन योजना, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण, यासारख्या अनेक योजना त्यांनी राबवल्या.