ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांग

Gunratan Sadawarte Vs Jarange Patil : 'जरांगे पाटील सारख्या वृत्तीला घाबरून आरक्षणाची प्रमाणपत्र देऊ नये'; सदावर्ते आक्रमक

मुंबई: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर भाष्य केले. सदावर्ते म्हणाले की, 'जरांगे नावाच्या माणसानं शासन निर्णय आणायला लावलं. दमछाक करून, लोकांना वेठीस धरून, मुंबईला वेठीस धरून, गणेशभक्तांना वेठीस धरून तो शासन निर्णय कसा बेकायदेशीर आहे? कसा तो शासन निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे? कसा तो शासन निर्णय अल्ट्रा व्हायरस आहे? आणि कसा तो शासन निर्णय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मागासवर्गीयांसाठी जी स्पेस निर्माण केली, अनीक्वलला इक्वल म्हणजे बरोबरीचा आणण्यासाठी त्यांच्यावर कसा घणाघाती आहे, या संबंधित बाबी घेऊन आज माननीय महसूल मंत्री तसेच, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे'.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले होते. यादरम्यान, मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात उपस्थित होते. तेव्हा, मनोज जरांगे म्हणाले होते की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'. 

त्यानंतर, राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे सहापैकी चार मागण्या मान्य केले. यासह, जरांगेंनी फडणवीसांचे आभार मानले. यासह, जरांगे म्हणाले की, 'कुणी बॅनर लावा किंवा कॅम्पेन करा, काय करायचं आहे ते करा. जीआरची अंमलबजावणी तातडीने करून हैदराबाद गॅझेट या नोंदणीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे, हे प्रमाणपत्र वाटायला सुरूवात करा. आम्ही पुन्हा एकदा तुमचं कौतुक आणि आभार मानू'.