Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
Air India Plane Crash Video: आज दुपारच्या सुमारास गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या विमानात 242 लोक होते. या विमानाने दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले आणि अवघ्या 2 मिनिटांत त्यांचा अपघात झाला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये असे दिसून येते की, विमान उड्डाण घेताच काही वेळातच खाली कोसळले.
दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अपघातानंतर जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तथापि, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ सध्या बंद करण्यात आले आहे. प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, अहमदाबाद अपघातावर डीजीसीएचे विधानही समोर आले आहे. निवेदनानुसार, एअर इंडियाचे बी787 विमान व्हीटी-एएनबी अहमदाबादहून लंडनला जात होते. परंतु, उड्डाण घेताचं ते कोसळले. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 242 लोक होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूचा समावेश होता.
एअर इंडिया विमान अपघाताचा व्हिडिओ -
पंतप्रधान मोदींनी विमान अपघाताबाबत गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. विमान अपघातानंतर बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी नागरी उड्डाण मंत्र्यांना दिले आहेत. तथापि, विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) चे महासंचालक पथकासह अहमदाबादला रवाना झाले आहेत.