9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे.

India Vs Pakistan Asia Cup 2025 : पाकिस्तान संघाची जिरवण्यासाठी 'हा' स्टार खेळाडू सज्ज; माजी क्रिक्रेटपटू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्रींनी केलं कौतुक

दुबई: 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. आशिया कप 2025 च्या सुपर 4 सामन्यात आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच, किक्रेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला टक्कर देण्यासाठी एक भारतीय खेळाडूची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, माजी क्रिक्रेटपटू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनीही या क्रिक्रेटपटूचे कौतुक केले आहे. चला तर जाणून घेऊया. 

ज्या खेळाडूबाबत माजी माजी क्रिक्रेटपटू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी कौतुक केले आहे, त्या क्रिक्रेटपटूचे नाव आहे अभिषेक शर्मा. त्याच्या तुफानी स्ट्राइक रेटमुळे पाकिस्तानसाठी तो मोठा धोका मानला जात आहे. अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये आतापर्यंत 225 च्या स्ट्राइक रेटने 99 धावा केल्या आहेत. यादरम्यान, माजी क्रिक्रेटपटू रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली की, 'अभिषेक शर्माचा बॅट स्विंग खूप प्रभावशाली आहे, मग तो फ्रंट फूट असो किंवा बॅक फूट. त्याच्या उत्कृष्ट बॅट स्विंगमुळे मला युवराज सिंगची आठवण येते'. तसेच, माजी क्रिक्रेटपटू सुनील गावस्कर म्हणाले की, 'मैदानात असल्यावर सर्वप्रथम अभिषेक शर्मा विकेटकिपिंग व्यवस्थित समजून घेतो. विशेष म्हणजे, त्याला माहित आहे की विकेटकिपर कुठे आहेत आणि मोकळी जागा बघून तो चौके मारतो. त्याची टायमिंग जरी चुकली तरी त्याच्याकडे बचाव करण्याची संधी असते. त्याच्या बॅटचा फ्लो, पिक, स्विंग आणि त्याचे तंत्र अद्भुत आहे'. 

हेही वाचा: India V/S Pakistan: ICC ने पाकिस्तानची जिरवली, ऍन्डी पायक्रॉफ्ट पुन्हा रेफरी

अभिषेक शर्माच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत बोलायचं झालं तर अभिषेकने 33.37 च्या सरासरीने आणि 198.13 च्या स्ट्राइक रेटने 634 धावा झळकावल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या नावावर दोन शतकं आणि दोन अर्धशतकांची नोंद आहे.