Kolhapur Circuit Bench : गोकुळ संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी, अवघ्या 20 तासांत याचिका दाखल
सुमारे 42 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे काल (17 ऑगस्ट) देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते लोकांर्पण करण्यात आले. राधाबाई शिंदे इमारत, मुख्य इमारतीचे सुद्धा सरन्यायाधीशांच्या लोकार्पण करण्यात आले. तसेच याचे कामकाज सोमवारपासून (18 ऑगस्ट) सुरू झाले आहे. मात्र पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या राजकारणचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल झाली आहे.
गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरसाठी आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या गोकुळ संघात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात प्रकाश बेलवाडे यांनी याचिका दाखल केली गेली आहे. यामध्ये गोकुळ संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा - PM Modi-Putin - व्लादिमीर पुतिन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून नक्की काय झाली चर्चा?
गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराबाबत प्रकाश बेलवाडे यांनी याचिका दाखल करत लेखापरीक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या. असे असतानाही संचालकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा उल्लेख बेलवाडे यांनी याचिकेत केला आहे. दरम्याने कोल्हापूर सर्किट बेंच ने बेलवाडे यांनी याचिका स्वीकारली आहे. मंगळवारी 26 ऑगस्टला याचिकेवर होणार सुनावणी आहे.
हेही वाचा - Airtel Network Down : एअरटेल गंडलं ! ना कॉल, ना मेसेज ; वापरकर्त्यांचा संताप, कंपनीकडून ग्राहकांना उत्तर
सर्किट बेंचसाठी 68 प्रशासकीय अधिकारी आणि 125 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्किट बेंचसाठी चार न्यामूर्तींसह सुमारे सव्वादोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.