या शुभ दिवशी शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण केल्या

नाग पंचमीला शिवलिंगाला अर्पण करा 'या' 5 वस्तू; कालसर्प दोषापासून मिळेल मुक्ती

Nag Panchami 2025: यंदा 29 जुलै 2025 रोजी नाग पंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकर आणि नाग देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. या शुभ दिवशी शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने कालसर्प दोषाचे निवारण होते आणि भगवान शिव प्रसन्न होतात. धर्मशास्त्रांनुसार या दिवशी पूजा विधी शुद्ध मनाने आणि श्रद्धेने केल्यास अनेक समस्या दूर होतात.

नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा 'या' गोष्टी -

कच्चे दूध - 

शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केल्याने कुंडलीत असलेल्या कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होऊ लागतो. यासोबतच भोलेनाथ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल देखील आणतात.

धतूरा -

भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेला धतूरा अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते. विशेषतः नाग पंचमीच्या दिवशी याचे अधिक महत्व आहे.

काळे तीळ - 

पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्यास कालसर्प दोष कमी होतो. तिळामुळे जीवनात शांतता आणि स्थैर्य येते.

हेही वाचा - दीप अमावस्येला करा 'पितृसूक्त' पठण, पितृदोषापासून मिळेल मुक्ती; जीवनात सुख-शांती राहील

बेलपत्र - 

शिवपूजेत बेलपत्राचे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. नाग पंचमीला बेलपत्र अर्पण केल्यास कौटुंबिक जीवनात समृद्धी येते आणि मानसिक तणावही दूर होतो.

हेही वाचा - Deep Amavasya 2025: दीप अमावस्या म्हणजे काय?, कधी साजरी केली जाते?

अक्षत आणि चंदन - 

अक्षत (तांदूळ) आणि चंदन शिवलिंगावर अर्पण केल्याने शांती, स्थिरता आणि समृद्धी प्राप्त होते. हे उपाय भगवान शिव आणि नाग देवता दोघांनाही प्रसन्न करतात.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. )