पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका चित्रपटगृहात

Pune Crime : मोठ्या आवाजात पत्नीला हॉरर सिनेमाची कथा सांगणे पतीला पडले महागात! चित्रपटगृहात मारहाण; जाणून घ्या

पुणे: नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेकजण चित्रपटगृहात जातात. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर अनेक हौशी मंडळी चित्रपटाची संपूर्ण कथा आपल्या प्रियजनांना सांगतात, त्यामुळे, चित्रपट पाहण्याची खरी मजा क्षणात निघून जाते. तसेच, काहीजण सोशल मीडियावर एखाद्या चित्रपटाबाबत आपली मते मांडतात, त्यामुळे चित्रपट पाहण्याचा सस्पेन्स निघून जातो. चित्रपट पाहताना, अनेकजण पुढे काय होईल याबाबत जोरजोरात चर्चा करतात. 

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका चित्रपटगृहातही अशीच एक घटना घडली आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक हॉरर चित्रपट पाहत होते. मात्र, चित्रपट पाहताना एक व्यक्ती त्याच्या पत्नीला मोठमोठ्याने हॉरर चित्रपटाची कथा सांगत होता. त्यामुळे, चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा मूड ऑफ झाला, तर पुढे बसलेल्या एका व्यक्तीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, संतापलेल्या व्यक्तीने थांबवण्याऱ्यालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मागील आठवड्यात चिंचवडमधील एका मल्टिप्लेक्समध्ये घडली. फिर्यादी व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत इंग्रजी हॉरर चित्रपट 'द कॉन्ज्यूरिंग-लास्ट राईट्स' पाहण्यासाठी गेला होता. तेव्हा, एक व्यक्ती त्याच्या पत्नीला चित्रपटाची कथा सांगत होता. त्यामुळे, चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा मूड ऑफ झाला. जेव्हा फिर्यादी व्यक्तीने शांतपणे चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला, तेव्हा ती व्यक्ती आक्रमक झाली. त्या व्यक्तीने फिर्यादी व्यक्तीला मारण्यास सुरुवात केली. यादरम्यान, जेव्हा फिर्यादी व्यक्तीच्या पत्नीने थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या व्यक्तीने फिर्यादी व्यक्तीच्या पत्नीलाही मारहाण केली. या घटनेत फिर्यादी व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. 

ही घटना घडल्यानंतर, चिंचवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादी व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतर, पोलिसांनी भारतीय कलम 117, 115 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही.