मुलगा मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला. मात्र, नं

Lover Video Viral : 'रात्री लपतछपत आलो.. फक्त 'तिला' भेटायला..! लग्न करायला थोडाच आलो होतो? असं कुठं असतं होय?'

Lover Video Viral : लोक म्हणतात की, प्रेम आंधळे असते. लोक यात अनेकदा वेडेपणा करतात. कधी कधी अक्षरशः हद्दच करतात. असाच एक प्रियकर मध्यरात्री त्याच्या प्रेयसीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला. मात्र, सकाळ होताच त्याच्या भोवती लोकांचा गराडाच पडला. आपल्याला चांगलेच बनवण्यात आले आहे, हे लक्षात येईपर्यंत जे व्हायचे ते झाले होते..! सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चला, जाणून घेऊया की, संपूर्ण प्रकरण काय आहे.

प्यार-मोहब्बत-इश्क आणि वेडेपणा.. वेडेपणा आणि नंतर एक नवीन कहाणी. प्रेमात प्रेमी-प्रेमिका एकमेकांना भेटणे ही बाब सामान्य आहे. परंतु, अनेक वेळा प्रेमी भेटण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडतात. या कथेतही असेच काहीतरी घडले आहे. असे व्हिडिओ आणि बातम्या अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काही घडले आहे, एक मुलगा मध्यरात्री त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गुपचूप पोहोचतो. परंतु, त्यानंतर त्याच्यासोबत असे काही घडते, ज्याचा त्याने विचारही केला नसेल.

हेही वाचा - Snake VIDEO : अरे देवा! घरातून 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला; माणसासारखा उभा राहिला! बघा थरारक व्हिडिओ

मी तर फक्त 'तिला' भेटायला आलो होतो मुलगा त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता खरा.. पण सकाळ होताच  त्याच्या नशिबाने असे वळण घेतले की, सर्व काही बदलले. प्रत्यक्षात, मुलगा या घरात पोहोचल्यावर त्या कुटुंबातील लोक जागे झाले आणि त्यांनी त्याला पकडले. यामुळे दोघांचीही भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. सकाळ होताच ही बातमी संपूर्ण गावात पसरली. यानंतर, गावातील लोक पंचायत बोलावतात आणि दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि खरोखरच जागच्या जागी लग्नघटिका येऊन ठेपते.

बिचाऱ्यानं विचार पण केला नसेल.. आणि ह्यांनी तर लग्नच लावून दिलं राव..! यानंतर, लगेचच, मुलगी तिच्या प्रियकराच्या कपाळावर गंधाचा नाम लावते आणि मुलाला तिच्या भांगात कुंकू भरायला लावले जाते. यावेळी, मुलाचा चेहरा पाहण्यासारखा होतो. कारण त्याचा चेहरा फिकट पडतो. तो खूप गडबडून गेलेला आणि अस्वस्थ दिसतो. मुलाचे वयही फार दिसत नाही. असे दिसते की मुलाला थोडा धक्का बसला आहे आणि तो अस्वस्थ झाला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा चेहरा लग्नाच्या आनंदाने भरलेला नाही, तर आता पुढे काय होईल, याची चिंता चेहऱ्यावर दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ पहा -

नशीब.. लग्न लावून दिलं.. मार दिला नाही..! तो फक्त त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता, लग्न करण्यासाठी नाही. तो रात्री प्रियकर होता आणि सकाळी नवरदेव बनला. हा व्हिडिओ @ranjeet__singh_60 नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. हा व्हिडिओ 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि कमेंट बॉक्स भरला आहे. काही लोक म्हणत आहेत, नशीब याला मार मिळाला नाही. इच्छा नसताना लग्न झाले हे खरे आहे, पण गावातील आणि मुलीच्या घरातील लोक समजूतदार आहेत, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.

हेही वाचा - हा आहे जगातील सर्वात महागडा कीटक... तब्बल 75 लाखांचा! जाणून घ्या, लोक याच्यासाठी का वेडे आहेत..