क्रिकेट खेळताना छातीवर लागला चेंडू; 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
लखनौ: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. क्रिकेट खेळताना छातीवर बॉल लागल्याने एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा हा अल्पवयीन मुलगा फलंदाजी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी संघाच्या गोलंदाजाचा चेंडू मुलाच्या छातीवर आदळला. चेंडू त्याच्या छातीवर आदळताच मुलगा बेशुद्ध पडला. यानंतर, त्याला ताबडतोब उचलून एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - देशात पुन्हा कोविडचा वाढता धोका; देशात 24 तासांत 360 नविन रुग्ण; महाराष्ट्र आणि केरळमध्ये वाढती चिंता
मृत मुलगा फिरोजाबादमधील नरखी पोलिस स्टेशन परिसरातील गढी रणछोर मोहल्ला येथील रहिवासी होता. सोमवारी संध्याकाळी तो फ्युचर क्रिकेट अकादमीच्या वतीने टुंडला येथे अंतिम सामना खेळण्यासाठी गेला होता. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. या प्रकरणात तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा - केंद्रीय आरोग्य विभागाचा मोठा निर्णय!सरकारी रुग्णालयांमध्ये MR च्या प्रवेशावर बंदी
दरम्यान, 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेसचा बाउन्सर लागल्याने मृत्यू झाला होता. तो डावखुरा फलंदाज होता. 27 नोव्हेंबर 2014 रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या मानेवर चेंडू लागला. तेव्हापासून क्रिकेट जगतात सुरक्षेच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा सुरू आहे. तथापि, असे असूनही, सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या मृत्यूच्या घटना समोर येत राहतात.