'ही' आहे जगातील सर्वात मोठी फाळणी ; एक-दोन नाही तर देशाचे झाले तब्बल 15 तुकडे
नवी दिल्ली: इंग्रजांविरोधात यशस्वी स्वातंत्र्यलढ्यानंतर, त्यांनी फाळणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर, अखेर भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. तेव्हापासून ते आजही या फाळणीची जगभरात चर्चा होते. याचं कारण म्हणजे या फाळणीदरम्यान अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आणि देशवासियांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. भारत अजूनही या फाळणीची झळ सोसत आहे. गेल्या अनेक काळापासून पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे. या कारणामुळे, भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत.
हेही वाचा: Independence Day 2025: नवा विक्रम! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावर आज 12वे भाषण
मात्र, तुम्हाला माहित आहे का? भारत आणि पाकिस्तान देशाच्या फाळणीनंतरच्या काही कालावधीनंतर एका देशाचे एक नाही दोन नाही तर तब्बल 15 तुकडे झाले. ही फाळणी जगातील सर्वात मोठी फाळणी बनली. ही फाळणी होती सोव्हिएत युनियनची. फाळणीनंतर, 15 विविध देश निर्माण झाले. सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक युनियनला सोव्हिएत युनियन म्हणून ओळखले जात असे. त्याची स्थापना 1922 मध्ये झाली होती. यात समाजवादी आणि प्रजासत्ताक सारख्या देशांचाही समावेश होता. मात्र, रशिया हा देश कम्युनिस्टांच्या ताब्यात होता. तसेच, सोव्हिएत युनियनची स्थापना 1922 मध्ये झाली होती. यानंतर, 15 स्वतंत्र देश निर्माण झाले.
मात्र, इतका मोठा देश चालवणे कठीण झाल्याने परिणामी अर्थव्यवस्था, उत्पादकता आणि तंत्रज्ञान मागे पडू लागले. यासह, वस्तूंच्या किंमती आणि महागाई वाढल्याने नागरिक उदास होऊ लागले. परिणामी, कम्युनिस्ट पक्षाची पकड डगमगू लागली. युक्रेन आणि लिथुआनिया यांच्यासह इतर ठिकाणी राष्ट्रवादी चळवळी पसरू लागल्या. या कालावधीत अमेरिकेची ताकद वाढल्याने, अफगाणिस्तान देशाचा पराभव आणि 1989 मध्ये बर्लिन भिंत पडल्याने सोव्हिएत युनियनचे नियंत्रण डगमगले. अखेर, डिसेंबर 1991 मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये मतभेद झाले आणि या काळात अनेक स्वतंत्र देश निर्माण झाले. या देशात रशिया, युक्रेन, बेलारूस, एस्टोनिया, लिथुआनिया, लाटविया, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि मोल्दोव्हा यांचा समावेश आहे.