प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी (नुनवान) येथून होणा

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; बालटाल व पहलगाम मार्ग बंद

Amarnath Yatra 2025

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम आणि बालटाल या दोन्ही प्रमुख बेस कॅम्पवरून होणारी वार्षिक श्री अमरनाथ यात्रा बुधवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी दिली. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी (नुनवान) येथून होणाऱ्या भाविकांच्या हालचालींना परवानगी नाकारली आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच पुढील मार्ग खुले करण्यात येणार आहेत.

3.93 लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन - 

यंदा अमरनाथ यात्रेत भाविकांची उल्लेखनीय गर्दी दिसून आली आहे. 3 जुलैपासून सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 3.93 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार आहे.

हेही वाचा - अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन! राजस्थानच्या महिलेचा मृत्यू, यात्रा तात्पुरती स्थगित

गेल्या वर्षी, अमरनाथ यात्रेने 5.10 लाख भाविकांची विक्रमी नोंद केली होती. यंदाही त्याच दिशेने वाटचाल सुरू असली तरी हवामानातील अडथळ्यांमुळे प्रशासन अधिक सतर्क आहे. तथापी, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की भाविकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून, हवामानात सुधारणा होताच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. 

हेही वाचा - Sawan 2025: अमरनाथ शिवलिंग कधी तयार होते आणि त्याचा चंद्राशी काय संबंध आहे?

यात्रेकरूंना धीर राखण्याचे आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरनाथ यात्रेला आणखी दोन आठवडे शिल्लक आहेत. प्रशासन वेळोवेळी हवामानाचे निरीक्षण करून मार्गदर्शन करत आहे. हवामान सुधारताच यात्रेचा मार्ग पुन्हा सुरू केला जाणार आहे.