पाकिस्तानवर आणखी एक कारवाई! भारतीय हल्ल्यात लाहोरमध्ये हवाई संरक्षण प्रणाली नष्ट
इस्लामाबाद: भारताने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले आणि अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, पाकिस्तानी सैन्याच्या हवाई संरक्षण युनिटचे मोठे नुकसान झाले असून ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय सशस्त्र दलांनी गुरुवारी सकाळी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. माध्यमातील वृत्तानुसार, भारताच्या हवाई हल्ल्यात लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला; 12 जवानांचा मृत्यू
पाकिस्तानी लष्कराच्या 9 संरक्षण प्रणाली युनिट्सवर ड्रोनने हल्ला -
प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातील 9 संरक्षण प्रणाली युनिट्सवर ड्रोनने हल्ला केल्याची बातमी आहे. ज्यामुळे संरक्षण प्रणाली युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय सैन्याने शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - पाकिस्तान हादरला! लाहोरनंतर कराचीमध्येही स्फोट
चीनने पाकिस्तानला पुरवली होती हवाई संरक्षण प्रणाली -
दरम्यान, कराची, लाहोर, गुजरांवाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियाँवाली, मियाँनो आणि अट्टॉक येथेही असे अनेक हल्ले करण्यात आले. तथापि, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून गोळीबार वाढवला आहे. याशिवलाय, चीनने पाकिस्तानला HQ 9 हवाई संरक्षण प्रणाली पुरवल्याचे सांगितले जात आहे.