Bengaluru: कुंपणानेच शेत खाल्लं तर..? 17वर्षीय बलात्कार पीडिता तक्रार नोंदवायला गेली.. पण पोलिसानेच पुन्हा केला बलात्कार
Crime News : अनेकदा मुलींना लग्नाचं वचन देऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या घटना घडतात. अशा प्रकारात मुलगी अल्पवयीन असेल तर, तो बलात्कार मानला जातो. अशाच एका प्रकरणात एका 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. तिच्या मित्राने या मुलीला लग्नाचं वचन दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यानंतर या मुलीने तिच्या आईला घडला प्रकार सांगितला. आईने तिच्यासह पोलीस ठाणं गाठलं. संरक्षण मिळण्याच्या अपेक्षेने या ठिकाणी आल्यानंतरही तिला पुन्हा फसवणुकीचाच सामना करावा लागला. या पोलीस ठाण्यातील हवालदारानेही तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात नराधम पोलिसाला अटक केली आहे.
हेही वाचा - Jharkhand Crime :18 अल्पवयीन मुलांकडून 5 अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार; ग्रामस्थ संतप्त
बंगळुरु येथे विकी नावाच्या व्यक्तीने या 17 वर्षांच्या मुलीला लग्नाचे वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला. याची तक्रार नोंदवण्यासाठी ती आईसह पोलीस ठाण्यात गेली. अशा प्रकरणांमध्ये पीडित मुलगी सज्ञान असेल तर कायद्यासमोर परिस्थितीचा आणि दोघांच्या सहमतीचा विचार केला जातो. मात्र, ती अल्पवयीन असल्याने तिची तक्रार पोलीस ठाण्यात लिहून घेण्यात आली. मात्र, ही तक्रार लिहून घेणाऱ्या पोलीस हवालदाराकडून संरक्षण मिळण्याऐवजी या बलात्कार पीडितेवर पुन्हा बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका पोलीस हवालदाराला अटक केली आहे. खाकी वर्दी म्हणजे सामान्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. मात्र, या खाकीलाच काळीमा फासण्याचं काम या हवालदाराने केलं आहे.
नेमकी काय घडली घटना? बोमन्नाहळ्ळी पोलीस ठाण्यात ही पीडिता तिच्या मित्राची तक्रार देण्यासाठी गेली. तिच्या आईने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या ठिकाणी काम करणाऱ्या हवालदार अरुण याने या मुलीची तक्रार लिहून घेतली. तुला न्याय मिळेल तू घाबरु नकोस, असं या हवालदाराने पीडितेला सांगितलं. त्यानंतर त्याने या मुलीला बंगळुरुतल्या हॉटेलवर बोलवलं. तिथे त्याने या पीडितेवर बलात्कार केला. कर्नाटकातल्या बंगळुरु या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.
अरुणने पीडितेला हॉटेलवर बोलवल्यानंतर काय घडलं? पीडितेच्या आरोपानुसार, अरुण या हवालदाराने तिला हॉटेलवर बोलवलं. त्यानंतर त्याने मद्याच्या बाटलीत काही उत्तेजक द्रव्य मिसळली आणि ते मद्य या मुलीला प्यायला लावलं. त्यानंतर अरुणने पीडितेवर बलात्कार केला आणि त्याचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. या प्रकाराबाबत कुठे बोललीस तर तुझे व्हिडीओ लीक करेन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली. मात्र या पीडितेने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात या मुलीचा मित्र विक्की आणि हवालदार अरुण या दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेचा जबाब पुन्हा नोंदवून घेतला आहे. तसंच अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येते आहे. पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ही धक्कादायक घटना बंगळुरु या ठिकाणी घडली आहे.
हेही वाचा - हनीमूनला गेलेल्या नवविवाहितेला पतीकडून मारहाण; जीव वाचवून गोव्याहून एकटीच परतली, गुन्हा दाखल
बंगळुरुमध्ये याच महिन्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार काही दिवसांपूर्वीच बंगळुरुमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली होती. एका मुलीवर तिच्या मित्रासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात पीडितेने तक्रार केल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली होती. पीडिता दिल्लीत राहते. ती कामानिमित्त बंगळुरुला आली होती. त्यावेळी तिला तिचा मित्र भेटला. त्याने तिला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. त्यावेळी त्याच्याबरोबर आणखी चार जण होते. या चौघांनी सदर मुलीला हॉटेलच्या छतावर नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना ताजी असतानाच आता बलात्कार पीडितेवर पोलीस हवालदाराने बलात्कार केल्याची घटना पुन्हा एकदा बंगळुरुमध्ये घडली आहे.