इंडिगो फ्लाइटमध्ये अडकले भूपेश बघेल! 30 मिनिटे दरवाजा न उघडल्याने उडाला गोंधळ
रायपूर: अहमदाबाद विमान अपघातानंतर विमानांमध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असल्याच्या अनेक बातम्या सध्या माध्यमांमध्ये येत आहेत. रायपूर विमानतळावर इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे 30 मिनिटे गोंधळ उडाला. लँडिंग दरम्यान इंडिगो विमानाचा दरवाजा 30 मिनिटे उघडला नाही. विमानात प्रवाशांमध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल हे देखील होते.
इंडिगो विमानाचा दरवाजा लॉक झाला -
प्राप्त माहितीनुसार, दिल्लीहून इंडिगोचे विमान मंगळवारी दुपारी 2:25 वाजता रायपूरच्या वीर नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. लँडिंगनंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमानाचे गेट लॉक झाले, ज्यामुळे शेकडो प्रवासी आत अडकले. या प्रवाशांमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, आमदार चतुरी नंद आणि रायपूरच्या महापौर मीनल चौबे देखील होते. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातातील 190 मृतदेहांची DNA ओळख पटली! आतापर्यंत 157 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द
फ्लाइटच्या सिस्टीममध्ये बिघाड -
इंडिगो विमानाच्या केबिनची स्क्रीन अचानक काम करणे बंद झाले. यानंतर फ्लाइटची सिस्टीम काम करणे बंद झाली. त्यामुळे गेट लॉक झाले. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. 30 मिनिटांनंतर विमानाचे गेट उघडल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हेही वाचा - दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान परतले; कंपनीने सांगितले यामागचे खरे कारण
भूपेश बघेल यांचा प्रतिक्रिया -
दरम्यान, भूपेश बघेल या संपूर्ण प्रकाराबद्दल प्रतिक्रिया दिली. बघेल यांनी म्हटलं आहे की, इंडिगो फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे गेट बंद झाले होते. सुमारे अर्धा तासाच्या अथक परिश्रमानंतर फ्लाइटचा दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले.