मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना

Truck Overturned in Ganga River: गंगा नदीवर पूल बांधताना मोठी दुर्घटना! पिलर बसवताना ट्रक नदीत उलटला; पहा अपघाताचा थरार

Truck Overturned in Ganga River: गंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या सहा पदरी पुलाच्या बांधकामावेळी मोठा अपघात घडला आहे. मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही कामगाराचा जीव गेला नाही. मात्र, अपघात घडताना काही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा - पाकिस्तानातला Business Class चा जुगाड पाहिलात का? Video पाहून डोक्याला हात लावाल!

क्रेनच्या मदतीने ट्रक बाहेर - 

घटनेनंतर बांधकाम कंपनीचे अभियंते आणि इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने ट्रक नदीतून बाहेर काढण्यात आला. तथापि, जड खांब अजूनही नदीत बुडालेला असून, कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले की हा भाग बार आणि सिमेंटपासून बनवलेला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यावर तो बाहेर काढण्यात येईल.

हेही वाचा - Viral Video : फाटक बंद होतं.. या महाभागाने बाईक उचलून रेल्वे ट्रॅक ओलांडला; ताकद आहे.. पण वापर कुठे करावा?

1947 कोटींचा प्रकल्प

गंगा नदीवरील हा सहा पदरी पूल सुमारे 10 किलोमीटर लांबीचा असून, फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. जवळपास 1947 कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाचे आतापर्यंत सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे. जून 2025 पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.