भारत आणि अमेरिकेत मोठा करार! पेंटागॉनने दिली 131 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी उपकरणांच्या पुरवठ्याला मान्यता
वॉशिंग्टन: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान, अमेरिकेने भारतासोबत एक मोठा लष्करी करार केला आहे. अमेरिकेने भारताशी असलेल्या धोरणात्मक संबंधांना अनुसरून भारताला 131 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे महत्त्वाचे लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट मालमत्ता पुरवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पेंटागॉन हाऊसच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये घबराट पसरण्याची शक्यता आहे.
भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मजबूत होणार -
पेंटागॉन अंतर्गत कार्यरत असलेल्या संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने (DSCA) लष्करी पुरवठ्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले असून अमेरिकन काँग्रेसला संभाव्य विक्रीबद्दल सूचित केले आहे. दोन्ही देशांमधील या करारामुळे भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल. अमेरिकेने भारताला लष्करी हार्डवेअर पुरवण्यास मान्यता दिल्यानंतर, एका अहवालात म्हटले आहे की भारताने 'सी-व्हिजन' दस्तऐवज आणि लॉजिस्टिक्सच्या इतर संबंधित घटकांमध्ये प्रवेश मागितला आहे.
हेही वाचा - अमेरिकेवर महामारीचे संकट? H5N1 विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ
दरम्यान, प्रस्तावित पुरवठ्याबद्दल भारतीय अधिकाऱ्यांकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. ही प्रस्तावित विक्री अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देईल. कारण ती अमेरिका-भारत धोरणात्मक संबंध मजबूत करण्यास आणि इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशिया प्रदेशात राजकीय स्थिरता, शांतता आणि आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाची शक्ती राहिलेल्या प्रमुख संरक्षण भागीदाराची सुरक्षा सुधारण्यास मदत करेल.
हेही वाचा - पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; नियंत्रण रेषेवर केला गोळीबार
भारताची भविष्यातील धोक्यांना तोंड देण्याची क्षमता सुधारेल -
अमेरिकेकडून लष्करी साहित्याचा पुरवठा झाल्यानंतर भारतीय सैन्याची ताकद वाढेल. अमेरिकेने म्हटले आहे की, प्रस्तावित विक्रीमुळे भारताची सागरी क्षेत्र जागरूकता, विश्लेषणात्मक क्षमता आणि धोरणात्मक भूमिका मजबूत करून सध्याच्या आणि भविष्यातील धोक्यांना तोंड देण्याची क्षमता सुधारेल.