पाकिस्तानातील सरगोधा येथे एफ-16 विमान पाडण्यात आले

मोठी बातमी! पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाने आणखी एक पाकिस्तानी विमान पाडले

Pakistan F-16 Shot Down By Indian Surface प्रतिकात्मक प्रतिमा

नवी दिल्ली: पठाणकोट सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाचे आणखी एक विमान पाडले आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानची एकूण 3 लढाऊ विमाने पाडली आहेत. ज्यामध्ये दोन JF-17 आणि एक F-16 विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानातील सरगोधा येथे एफ-16 विमान पाडण्यात आले तर भारतातील पंजाब आणि राजस्थानमध्ये जेएफ-17 विमान पाडण्यात आले. एक पाकिस्तानी पायलट सध्या भारताच्या ताब्यात आहे. जेएफ-17 विमानातील आणखी एक पायलट भारतीय हद्दीत पडल्याची बातमी आहे. ज्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - भारतीय लष्कराने पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने JF-17 पाडली; अनेक क्षेपणास्त्रेही केली नष्ट

पाकिस्तानी विमान पाडण्यासाठी S-400 प्रणालीचा वापर -  

दरम्यान, भारताच्या एस-400 हवाई संरक्षण प्रणालीने या विमानाला लक्ष्य केले. पठाणकोट एअरबेस पूर्णपणे सुरक्षित आहे. डीआयजी पठाणकोट यांनी एअरबेसला कोणतेही नुकसान झाले नसल्याची पुष्टी केली. पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर आणि इतर शहरांना लक्ष्य करून केलेले पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हाणून पाडण्यासाठी त्यांनी आपल्या S-400 प्रणालीचा वापर केल्याचे भारताने म्हटले आहे.

हेही वाचा - 'पाकिस्तान तर जन्मापासूनच खोटे बोलत आहे,' UNSC मध्ये भारताचा हल्लाबोल

पाकिस्तानने 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली  - 

गुरुवारी अंधार पडताच पाकिस्तानने सीमेजवळील भारताच्या विविध शहरांवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानने फक्त राजस्थानातील जैसलमेरमध्ये 70 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केले. तथापि, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे पाडली. पाकिस्तानच्या प्रत्येक वाईट हेतूला उत्तर देण्यासाठी, भारताच्या सर्व संरक्षण यंत्रणा सध्या पूर्णपणे सक्रिय आहेत आणि पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.