भाजपचे देशभरात 240 लोकसभा खासदार, सुमारे 1,500 आमद

JP Nadda On BJP: भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला; जेपी नड्डा यांची घोषणा; सदस्यसंख्या 14 कोटींवर पोहोचली

JP Nadda On BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी घोषणा केली की, भारतीय जनता पक्ष (भाजप) 14 कोटी सदस्यांसह जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. यापैकी 2 कोटी सक्रिय सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले. विशाखापट्टणम येथे झालेल्या पक्षाच्या रॅलीत भाषण करताना नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, भाजपचे देशभरात 240 लोकसभा खासदार, सुमारे 1,500 आमदार, आणि विधान परिषदांमध्ये 170 हून अधिक सदस्य आहेत.

हेही वाचा - Sanjay Raut: टीम इंडियाला पाकिस्तानसोबतची मॅच खेळायची नाहीये, पण क्रिकेटपटूंवर जय शाहांचा..., संजय राऊतांचा गौप्यस्फोट

राज्यांमध्ये एनडीएची सरकारे - 

नड्डा यांनी सांगितले की, भारतामध्ये 20 राज्यांमध्ये एनडीएची सरकारे आहेत आणि त्यापैकी 13 राज्यांमध्ये भाजपचे नेतृत्व आहे. आम्ही देशातील सर्वात मोठा प्रतिनिधी पक्ष आहोत. त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत कामगिरी आणि जबाबदार सरकारचे राजकारण झाले आहे, तर मागील सरकारांमध्ये कामगिरी न करण्याचे राजकारण होते. त्यांनी विकास कामे केली नाहीत. मागील सरकारांनी जाहीरनाम्यांमध्ये दिलेली आश्वासनेही विसरली होती.

हेही वाचा - Girish Mahajan: 'विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात...', महाजनांच्या वक्तव्याने चर्चांणा उधाण

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, पूर्वी घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाचे राजकारण होते. परंतु, आम्ही अशा पक्षातून आलो आहोत ज्याचा वैचारिक पाया आहे. तथापी, आंध्र प्रदेशातील विकासाचा उल्लेख करताना नड्डा म्हणाले की, राजधानी अमरावतीच्या बांधकामासाठी केंद्र सरकारने 15,000 कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान यावेळी भाजपचे वैचारिक अधिष्ठान, संघटनशक्ती आणि मोदींचे नेतृत्व या यशामागील मुख्य घटक असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.