सुरक्षित लँडिंगनंतर, विमानातील सर्व प्रवाशांना आपत

जयपूरहून चंदीगडला जाणाऱ्या विमानाचे दोन्ही इंजिन निकामी! 150 प्रवाशांचं पुढे काय झालं?

IndiGo Airlines Emergency Landing

चंदीगड: जयपूरहून चंदीगडला जाणाऱ्या विमानाचे दोन्ही इंजिन हवेतच निकामी झाल्याने चंदीगडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आपत्कालीन लँडिंग केल्याने विमानातील 150 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा जीव थोडक्यात वाचला. सुरक्षित लँडिंगनंतर, विमानातील सर्व प्रवाशांना आपत्कालीन गेटमधून बाहेर काढण्यात आले. तथापि, डीजीसीएने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

इंडिगो एअरलाइन्सचे विमानाचे दोन्ही इंजिन हवेत बंद - 

प्राप्त माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सचे विमान 6E-7742 शुक्रवारी सकाळी 6 वाजता जयपूर विमानतळावरून उड्डाण केले. विमान सकाळी 7 वाजताच्या सुमारास एक तास 10 मिनिटांनी चंदीगडमध्ये उतरणार होते, परंतु विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानाचे दोन्ही इंजिन हवेतच निकामी झाले. इंजिनमध्ये बिघाड झाला आणि विमानाला आग लागली. विमानातील समस्येची जाणीव पायलटला झाल्यावर त्याने क्रू मेंबर्सशी चर्चा केली. पायलटने एटीसीशी संपर्क साधला आणि विमानातील सर्व 150 प्रवाशांना सतर्क केले.

हेही वाचा - पंतप्रधान शाहबाज यांच्यानंतर आता इम्रान खानचे खाते भारतात ब्लॉक

दरम्यान, वैमानिकाने सतर्कता दाखवत विमानाचे चंदीगड विमानतळावर सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग केले. खबरदारीचा उपाय म्हणून, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, हवाई दलाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक धावपट्टीवर पोहोचले. त्यांनी तात्काळ प्रवाशांना विमानाबाहेर काढले. पायलटने सांगितले की, पावसामुळे इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, कारण लँडिंगच्या 15 मिनिटे आधी जेव्हा लँडिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली तेव्हा एका इंजिनला अचानक आग लागली. दुसरे इंजिन सुरू झाल्यावर तेही आगीच्या भक्ष्य स्थानी पडले. 

हेही वाचा - गोव्याच्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

तथापि, विमानाचे इंजिन अचानक कसे निकामी झाले? असा सवाल नागरी विमान वाहतूक महासंचालकाने  (डीजीसीए) केला आहे. उड्डाण करण्यापूर्वी विमानाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली नव्हती का? विमानात कोणी छेडछाड केली आहे का? केवळ विमान कंपनीच नाही तर ATR-72 विमान बनवणाऱ्या कंपनीलाही विमानातील दोषाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.