बजेट 2025 चा बाजारावर काय परिणाम होणार ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. या सरकारने प्रस्तावित केलेले बदल अनेक क्षेत्रांवर मोठा प्रभाव टाकणार आहेत. बजेटच्या विस्तारानंतर औषधे आणि कच्च्या मालावरील करसवलतीमुळे आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्राचा खर्च कमी होईल. विशेषतः जहाजबांधणी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला याचा फायदा होईल, कारण उत्पादन खर्च घटल्यामुळे या क्षेत्रातील वस्तू स्वस्त होणार आहेत.
त्याचबरोबर, सरकारने हस्तकला उद्योगाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. यामुळे पारंपरिक भारतीय उद्योगांना मदत होईल आणि लहान उद्योजक, कारागिरांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळेल.
हेही वाचा: Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा
मात्र, काही तांत्रिक उत्पादनांवर, विशेषतः इंटरॅक्टिव्ह फ्लॅट-पॅनेल डिस्प्ले Interactive flat-panel display (जसे की मोठे टचस्क्रीन मॉनिटर्स) यांच्यावर सीमाशुल्क वाढविण्यात आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील काही वस्तू महाग होतील. याचा परिणाम कंपन्यांवर आणि सामान्य ग्राहकांवर होऊ शकतो, विशेषतः डिजिटल शिक्षण आणि कार्यालयीन उपकरणे यांना अधिक खर्च करावा लागू शकतो.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा
2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील हे बदल संमिश्र स्वरूपाचे आहेत. काही क्षेत्रांना फायदा होईल, तर काहींना नवीन अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. औषधे आणि उत्पादन क्षेत्राला दिलेल्या सवलती अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहेत, तर काही वस्तूंवरील वाढीव करांचा परिणाम बाजारावर दिसून येईल.