Judge Cash Row: उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराजवळ सापडल्या जळालेल्या नोटा, पहा व्हिडिओ
Judge Cash Row: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित नोटा घोटाळ्यावरून संपूर्ण देशात गदारोळ सुरू आहे. देशातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नोटा घोटाळ्याच्या आठ दिवसांनंतर, म्हणजे आज रविवारी वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर जळालेल्या नोटा सापडल्या. घराला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाला आत जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडले. या जळालेल्या नोटांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा दिसत आहेत.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आरोप फेटाळले -
दरम्यान, स्वतः न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत आणि म्हटले आहे की त्यांना माहित नाही की ही रोकड त्यांच्या घरी कशी पोहोचली. ते त्यांचे पैसे नाहीत. त्यांनी या प्रकरणाला त्यांच्याविरुद्धचे षड्यंत्र म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि सांगितले की याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. आता हा वाद खूप वाढला आहे. शनिवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाने काही कागदपत्रे जारी केली आणि न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरातून सापडलेल्या जळालेल्या रोख रकमेचा व्हिडिओही शेअर केला.
तथापी, न्यायमूर्ती वर्मा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना म्हटलं की, मी स्पष्टपणे सांगतो की मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्या स्टोअररूममध्ये कधीही रोख रक्कम ठेवली नाही. हा माझ्याविरुद्ध एक सुनियोजित कट असू शकतो.
हेही वाचा - Narayana Murthy On AI: ''एआयबद्दल अतिशयोक्ती करणे थांबवा''; नारायण मूर्ती यांनी असं का म्हटलं?
सफाई कर्मचाऱ्यांनी काय म्हटले?
स्वच्छता कर्मचारी इंद्रजीत यांनी सांगितले की, आम्ही या सर्कलमध्ये स्वच्छेतेची काम करतो. 4-5 दिवसांपूर्वी आम्ही इथे कचरा साफ करत होतो. तेव्हा आम्हाला कचरा गोळा करताना 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांचे काही छोटे तुकडे सापडले. तथापी, स्वच्छता कर्मचारी सुरेंद्र यांनी सांगितलं की, आम्ही या कचरा संकलन वाहनांसह काम करतो. आम्हाला 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा सापडून 4-5 दिवस झाले आहेत. आमच्याकडे अजूनही जळालेल्या नोटांचे काही तुकडे आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
खरंतर न्यायाधीश वर्मा यांच्या घरात आग लागली होती आणि त्यावेळी ते घरी नव्हते. यावेळी, पोलिस आणि अग्निशमन दलाने आग विझवली परंतु या घरातून मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटाही जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तथापि, नोटांचा हा ढीग जळून राख झाला होता. यानंतर, ही बातमी लवकरच हायकमांडपर्यंत पोहोचली आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.