भारत युद्धभूमीवर पाकिस्तानशी दोन हात करत असताना, चीनचे गुप्तहेर जहाज भारतीय समुद्रात
China Spy Ship In Malakka Strait: संपूर्ण जगाला चीनचे 'खायचे दात वेगळे आणि दाखवायाचे दात वेगळे' आहेत, हे माहीत आहे. एकीकडे ते जगासमोर सभ्यतेच्या चेहऱ्याने वावरतात. पण हा आतल्या गाठीचा ड्रॅगन कट रचण्याची एकही संधी सोडत नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून भारतीय सैन्य ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यात व्यग्र होते. दरम्यान, चीनने याच परिस्थितीचा फायदा उठवत हिंदी महासागरात एक मोठी धाडसी कारवाई केली. चीनचा हा आगाऊपणा इतका जबरदस्त होता की, त्याची माहिती मिळताच भारतीय नौदल ताबडतोब अॅक्शन मोडमध्ये आले. तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खरंतर, घडलं असं की, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, चिनी गुप्तचर जहाज 'दा यांग हाओ' मलाक्का सामुद्रधुनीतून थेट बंगालच्या उपसागरात पोहोचलं.
हेही वाचा - भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या किराणा हिल्समधील आण्विक शस्त्रसाठ्यातून 'रेडिएशन लीकेज'?
चीनचे गुप्तचर जहाज 'दा यांग हाओ' मलाक्का सामुद्रधुनीतून बंगालच्या उपसागरात पोहोचले, ज्यामुळे भारतीय नौदल तातडीने सतर्क झाले. हे जहाज समुद्राच्या खोलीचे मॅपिंग करण्यास सक्षम आहे. भारत पाकिस्तानशी युद्धात व्यग्र होता आणि चीनने भारताची जराशी पाठ फिरलेली पाहून हे धाडस केले.
समुद्राच्या खोलीचे नकाशे काढण्यास सक्षम
भारताने नेहमीच चिनी संशोधन जहाजांना बंगालच्या उपसागरात प्रवेश करण्यापासून रोखले आहे. बांगलादेश असो, श्रीलंका असो किंवा मालदीव असो, भारत, त्याच्या सर्व शेजारी देशांसह, चीनला या प्रदेशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. भारत पाकिस्तानमध्ये व्यग्र होता. मग चीनची आधुनिक संशोधन जहाजे गुप्तपणे येथे आली. या जहाजाला चीनची 'फ्लोटिंग लॅब' असेही म्हणतात. तथापि, भारत आणि इतर देश ते एक गुप्तचर जहाज मानतात. हे जहाज समुद्राच्या खोलीचे मॅपिंग करण्यासाठी ओळखले जाते. या जहाजाच्या मदतीने चीनला क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे आणि पाणबुड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.
हे तथाकथित संशोधन जहाज विशाखापट्टणमपासून 463 किमी अंतरावर होते ओपन-सोर्स इंटेलिजेंस तज्ज्ञ डेमियन सायमन म्हणाले की, जहाज श्रीलंकेच्या दक्षिणेकडे जात होते. ड्रॅगनने 2019 मध्ये आपल्या ताफ्यात त्याचा समावेश केला. गेल्या काही वर्षांत, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात अशी अनेक चिनी संशोधन जहाजे दिसली आहेत. असे मानले जाते की, ही चिनी जहाजे संशोधनाच्या नावाखाली लष्करी कारवायांसाठी महत्त्वाचा डेटा गोळा करतात. चिनी नौदलाकडे दा यांग हाओ सारखी एकूण चार संशोधन जहाजे असल्याचे मानले जाते. जियांग यांग हाँग 3 हे जहाज अलीकडेच मालदीवची राजधानी माले येथे दोनदा थांबले. भारतीय क्षेपणास्त्र चाचणीच्या अगदी आधी बंगालच्या उपसागरात जियांग यांग हाँग 1 दिसल्याचा दावा केला जात आहे. हे संशोधन जहाज एका वेळेला तर, विशाखापट्टणम बंदरापासून फक्त 250 नॉटिकल मैल म्हणजेच 463 किलोमीटर अंतरावर होते.
हेही वाचा - Robot In Indian Army : भारताचे रोबोट गाजवणार रणांगण! जाणून घ्या, रोबोटिक आर्मी लढण्यासाठी कधी तयार होईल?