CP Radhakrishnan Oath Ceremony : सी पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
नवी दिल्ली: सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सी पी राधाकृष्णन देशाचे 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यामुळे हा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे.
दरम्यान मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करुन विजय मिळवला आहे.
राधाकृष्णन देशाचे 15 वे उपराष्ट्रपती बनले मंगळवारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची भारताचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. निवडणुकीनंतर निकाल जाहीर करताना राज्यसभेचे सरचिटणीस आणि निवडणूक अधिकारी पीसी मोदी म्हणाले की, 781 खासदारांपैकी 767 खासदारांनी मतदान केले. म्हणजेच 98.2 टक्के मतदान झाले.
सीपी राधाकृष्णन यांनी रेड्डी यांचा पराभव करुन विजय मिळवला. माजी उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची धुरा आता सी पी राधाकृष्णन सांभाळणार आहेत.