अहमदाबाद विमान अपघातातील एकूण डीएनए नमुन्यांची संख

अहमदाबाद विमान अपघातातील 80 पीडितांचे DNA नमुने जुळले, 33 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

Ahmedabad Plane Crash

अहमदाबाद: अहमदाबाद विमान अपघाताबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या विमान अपघातात मृत्यू झालेल्या 80 बळींचे डीएनए नमुने जुळले आहेत. तथापी, 33 जणांचे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. अहमदाबाद विमान अपघातातील एकूण डीएनए नमुन्यांची संख्या 80 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही मृतदेह समाविष्ट आहेत. DNA जुळलेले मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी रविवारी रात्री माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. 

हेही वाचा -  प्रवाशांचा जीव पुन्हा धोक्यात! हिंडन विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड; टेकऑफ रद्द

अहमदाबादहून लंडनला उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान निवासी भागात कोसळले होते. एअर इंडियाने विमान अपघाताची पुष्टी केली आहे. या विमानात 242 जण होते, ज्यात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासन डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू ठेवत आहे. डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितले की, जुळलेल्या डीएनए नमुन्यांची एकूण संख्या 80 वर पोहोचली आहे. यापैकी 47 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

हेही वाचा -  मोठी बातमी! विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली; DNA जुळला

डॉ. पटेल यांनी सांगितले की, DNA जुळलेल्या आणखी दोन मृताचे नातेवाईक सोमवारी रात्री येण्याची अपेक्षा आहे. तसेच 13 जण मंगळवारी मृतदेह घेण्यासाठी येणार आहेत. उर्वरित डीएनए जुळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.