भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी नोंदवली असून याचे केंद्र

गुजरात हादरलं! कच्छ जिल्ह्याला भूकंपाचा धक्का; 'इतकी' होती तीव्रता

Earthquake In Kutch प्रतिकात्मक प्रतिमा

Earthquake In Gujarat: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात रविवारी रात्री 9 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी नोंदवली असून याचे केंद्रबिंदू खावडा परिसरातील कच्छपासून 20 किमी पूर्व आग्नेयेस होते. भूकंपशास्त्रीय संशोधन संस्था गांधीनगरने याबाबत माहिती दिली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. सध्या कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 

हेही वाचा -अमेरिकेतील अलास्का राज्यात भूकंपाचे धक्के; त्सुनामीचा इशारा जारी

तीन दिवसांत 3 वेळा भूकंपाचे धक्के - 

गेल्या तीन दिवसांत भूकंपामुळे कच्छमध्ये तीन वेळा जमीन हादरली आहे. गुजरातच्या या भागात वारंवार भूकंपाचे धक्के येत आहेत, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि लोकांची चिंता वाढली आहे. तथापि, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

हेही वाचा - रशियाला 7.4 तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

कच्छ प्रदेश भूकंपांसाठी संवेदनशील - 

तज्ज्ञांच्या मते, कच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के येणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु या धक्क्यांपासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. कच्छ प्रदेश भूगर्भीयदृष्ट्या भूकंपांसाठी संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथे अनेकदा सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप येत राहतात.