हे सर्व नवे नियम बिहार निवडणुकीपासून लागू केले जाण

Bihar Polls : मतदारांच्या सुलभतेसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; EVM बॅलेट डिझाइनमध्ये होणार हे बदल

नवी दिल्ली : आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदारांना अधिक सोयीस्कर आणि स्पष्टता मिळावी यासाठी मतदान यंत्रावरील (EVM) मतपत्रिकेच्या (Ballot Paper) डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. हे नवे नियम बिहारमधील निवडणुकांपासून लागू होणार आहेत.

मतपत्रिकेतील महत्त्वाचे बदल निवडणूक आयोगाने मतपत्रिका अधिक वाचनीय बनवण्यासाठी खालील नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. हे सर्व नवे नियम बिहार निवडणुकीपासून लागू केले जाणार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी आणि निवडणूक पारदर्शक पद्धतीने होण्याच्या उद्देशाने हे नियम आणल्याचे आयोगाने म्हटले आहे. रंगीत फोटो : पहिल्यांदाच, मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जाणार आहेत. प्रत्येक उमेदवाराचा चेहरा फोटोच्या जागेच्या तीन-चतुर्थांश भागावर असेल, जेणेकरून तो स्पष्टपणे दिसेल. ठळक अनुक्रमांक : उमेदवारांचे आणि 'नोटा' (NOTA) चे अनुक्रमांक आंतरराष्ट्रीय भारतीय अंकात (International Indian Numerals) असतील आणि ते ३० फॉन्ट साईजमध्ये छापले जातील, जेणेकरून ते सहज वाचता येतील. समान फॉन्ट : सर्व उमेदवारांची आणि 'नोटा'ची नावे एकाच प्रकारच्या आणि मोठ्या फॉन्टमध्ये असतील. कागदाचा दर्जा : मतपत्रिका 70 जीएसएम (GSM) च्या कागदावर छापली जाईल. विधानसभा निवडणुकांसाठी, गुलाबी रंगाचा (Pink Colour) विशिष्ट कागद वापरला जाईल.

हेही वाचा - PM Narendra Modi Education: पंतप्रधान मोदींचे शिक्षण किती?, शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत त्यांच्याकडे किती पदव्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

बिहार निवडणूक आणि वादाचा मुद्दा बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि निवडणूक आयोग लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने बिहारमध्ये 'स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांसारख्या 'महागठबंधन'मधील मित्रपक्षांनी हा कार्यक्रम भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी सुरू केल्याचा आरोप केला आहे. या विरोधात त्यांनी 'व्होटर अधिकार यात्रा' देखील काढली आहे.

हेही वाचा - PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींना या पाकिस्तानी भगिनीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! जाणून घ्या, ही महिला कशी बनली मोदींची बहीण